आटपाडी : आटपाडी तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालल्यामुळे प्रशासकीय यंत्रणेवरील ताण वाढला आहे. अशा परिस्थितीत तहसीलदार सचिन मुळीक यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत राजेवाडी (ता. आटपाडी) येथील तरुण उद्योजक सुभाष सातपुते यांनी दोन लाख पस्तीस हजारांची औषधे आणि साहित्य आरोग्य विभागास भेट दिली.
सामाजिक बांधीलकीतून राजेवाडीचे उद्योजक सुभाष सातपुते यांनी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि ग्रामीण रुग्णालयात आवश्यक असणारी विविध प्रकारची औषधे, गोळ्या, पीपीई कीट, मास् , सॅनिटाइजर, ऑक्सिमीटर, टेम्परेचर गन असे साहित्य मुंबई येथून उपलब्ध करून दिले. यावेळी तहसीलदार मुळीक, पोलीस निरीक्षक भानुदास निंबोरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. साधना पवार, नायब तहसीलदार डॉ. राजकुमार राठोड, डॉ. इम्रान तांबोळी उपस्थित होते.
सुभाष सातपुते यांनी अतितातडीने केलेली ही मदत तालुक्यातील अनेक रुग्णांसाठी नवसंजीवनी ठरेल, असे तहसीलदार मुळीक व डॉ. पवार म्हणाल्या.
यावेळी सादिक खाटीक, सुधीर विभूते, प्रवीण कुचेकर, सचिन आटपाडकर उपस्थित होते.