शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

पोलिस भरतीसाठी एमबीए, इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर !

By admin | Updated: March 24, 2017 23:36 IST

शासकीय नोकरीच हवी : बेरोजगारी आणि वाढत्या स्पर्धेमुळे नाईलाजास्तव खाकी वर्दीकडे आकर्षित झाल्याचे युवकांची भूमिका

सातारा : सध्याच्या स्पर्धात्मक युगामध्ये नोकरीसाठी प्रत्येकाला जिवाचे रान करावे लागत आहे. उच्चशिक्षित युवक बेरोजगार होत असल्याने मिळेल ती शासकीय नोकरी पदरात पाडून घेण्यासाठी सध्याच्या पिढीतील युवकांची धडपड सुरू असल्याचे दिसून येत आहे. सातारा जिल्हा पोलिस दलातील भरतीला यंदा जवळपास पाच हजार अर्ज आले आहेत. त्यापैकी काहीजण गैरहजर राहत आहेत तर काहीजण अपात्र ठरत आहेत. ‘लोकमत टीम’ने शुक्रवारी पोलिस परेड ग्राऊंडवर जाऊन काही युवकांशी चर्चा केली. त्यावेळी अनेकांनी आपले खरे शिक्षण सांगितले. परंतु काही युवकांना आपले शिक्षण सांगणे अपमानस्पद वाटत होते. ‘आम्ही शिक्षण सांगतो; पण आमची नावे छापू नका,’ असे बरेचजण सांगत होते. त्यांना विश्वासात घेतल्यानंतर घडाघडा बोलू लागले. फलटण येथील एक युवक सध्या पुणे येथे एका कंपनीत काम करतो. तो एमबीए झाला आहे. भाऊ पोलिस दलात असल्याने मीही खाकी वर्दीकडे आकर्षित झाल्याचे तो सांगत होता. पाटण तालुक्यातील दुर्गम भागात राहणारा अनिकेत (नाव बदलले आहे) हा इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे. दोन वर्षे झाले त्याने ही पदवी घेतली आहे. पुण्यातील कंपनीत तो काम करत आहे. या ठिकाणी नोकरीची हमी आणि सुरक्षितता नसल्यामुळे शासकीय नोकरी हवी, असे त्याचे मत आहे. साताऱ्यातील राजेंद्र हा युवक तर बी.एस.सी.बी.एड झाला आहे. काही वर्षांपासून तो शहरातील एका खासगी शाळेत शिक्षक म्हणून नोकरी करत आहे. मात्र, या ठिकाणी त्याला तुटपुंजे मानधन आणि घरातील जबाबदारी त्याच्यावर असल्यामुळे तो पोलिस होण्याचे स्वप्न उराशी बाळगून भरतीसाठी मैदानात उतरलाय.पोलिस भरतीसाठी उच्चशिक्षित तरुणांचा भरणा अधिक आहेच; परंतु टेक्निकल कोर्स पूर्ण केलेले युवकही यामध्ये मागे नाहीत. ‘आयटीआय’चा कोर्स केलेले युवकही भरतीसाठी आल्याचे पाहायला मिळाले. नोकरीसाठी आयुष्यभर भटकण्यापेक्षा शासकीय नोकरी केव्हाही चांगली, असे अनेक युवक बोलत होते. पोलिस दलात एकदा इन्ट्री झाल्यानंतर पुढे खात्याअंगतर्गत परीक्षा देऊन मोठे अधिकारी होण्याचे स्वप्नही बऱ्याच युवकांनी पाहिल्याचे दिसून आले. भरतीसाठी शंभर टक्के योगदान देण्याचा निश्चय युवकांनी केला आहे. (प्रतिनिधी)