शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

महापौरांचा राजीनाम्यास नकार

By admin | Updated: November 3, 2015 23:59 IST

सांगली महापालिका : काँग्रेसअंतर्गत संघर्ष उफाळला; जयश्रीताई पाटील यांच्या निर्णयाकडे लक्ष

सांगली : काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याने माझा राजीनामा मागितलेला नाही. अन्य कुणाला राजीनामा मागण्याचा अधिकार नाही, असे स्पष्ट करीत महापौर विवेक कांबळे यांनी राजीनामा देण्यास मंगळवारी नकार दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यावरून काँग्रेसअंतर्गत संघर्ष उफाळला आहे. दरम्यान, महापौरविरोधी गटाने त्यांच्या राजीनाम्यासाठी जयश्रीताई मदन पाटील यांच्याकडे प्रयत्न चालविले आहेत. त्यांच्या आदेशाशिवाय राजीनाम्याचा निर्णय होऊ शकत नाही. त्यामुळे त्यांच्या निर्णयाकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. महापालिकेच्या सोमवारी झालेल्या महासभेपूर्वी गटनेते किशोर जामदार यांनी महापौर कांबळे यांची भेट घेऊन राजीनामा देण्याची मागणी केली. मदन पाटील यांनी शेवटचे तीन महिने मिरजेचे बसवेश्वर सातपुते यांना संधी देण्याचा शब्द दिला होता. त्यांच्या इच्छेनुसार आपण राजीनामा द्यावा, असा निरोप दिला; पण त्याचवेळी महापौर कांबळे यांनी राजीनाम्याला बगल दिली होती. ते राजीनामा देणार नाहीत, अशी चर्चा मंगळवारी काँग्रेस गोटात होती. राजीनाम्यासाठी नेत्यांनीच आदेश द्यावे लागतील, असा सूरही होता. मदनभाऊ हयात असताना पालिकेत त्यांचा शब्द अंतिम होता; पण त्यांच्या निधनानंतर आता पालिकेची गणिते बदलली आहेत. मदनभाऊ गटाचे नेतृत्व त्यांच्या पत्नी जयश्रीताई पाटील यांच्याकडे आले आहे, तर काँग्रेसचे दुसरे नेते आमदार डॉ. पतंगराव कदम यांचेही मत याबाबत घ्यावे लागणार आहे. नगरसेवकांची बैठक : काय घडले फार्महाऊसवरजानेवारीमध्ये कांचन कांबळे यांनी महापौरपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर नव्या महापौर निवडीसाठी मदनभाऊ पाटील यांच्या कळंबी येथील फार्महाऊसवर नगरसेवकांची बैठक झाली होती. बैठकीत विवेक कांबळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. कांबळे हे रिपाइंचे जिल्हाध्यक्ष होते; पण त्यांनी पक्षाचा त्याग करून काँग्रेसच्या चिन्हावर पालिका निवडणूक लढविली होती. सभागृहातही ते ज्येष्ठ असल्याने त्यांना सर्वप्रथम संधी दिली. याच बैठकीत मदनभाऊंनी उर्वरित सव्वा वर्षात तीन महापौर करायचे आहेत, असे जाहीरपणे सांगितले होते; पण उर्वरित दोन महापौर पदाच्या दावेदारांची नावे जाहीर केली नव्हती. विवेक कांबळे यांना सहा महिने व उर्वरित सहा महिन्यांत आणखी दोन महापौर, असा फॉर्म्युला होता. त्यामुळे बसवेश्वर सातपुते अथवा शेवंता वाघमारे यांच्या नावाची चर्चा झाली नव्हती, असा दावा महापौर समर्थक करीत आहेत.