शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

महापौर पदासाठी उमेदवारीची गट्टी

By admin | Updated: January 18, 2016 23:47 IST

नेत्यांपुढे आव्हान : काँग्रेस नगरसेवकांच्या गुरुवारी होणाऱ्या बैठकीकडे लक्ष

सांगली : महापौर पदाच्या शर्यतीतील इच्छुक उमेदवारांनी एकमेकांना शह देण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे. प्रबळ दावेदाराविरोधात इतर इच्छुकांची गट्टी जमू लागली आहे. त्यातून पैशाचा खेळही चर्चेत आला आहे. येत्या २१ जानेवारी रोजी होणाऱ्या काँग्रेस नगरसेवकांच्या बैठकीत इच्छुकांनी शक्तिप्रदर्शनाची तयारी सुरू केली आहे. महापौर पदाची निवड ६ फेब्रुवारी रोजी होणार आहे. अजून निवडीची तारीख निश्चित नसली तरी, लवकरच त्याची घोषणा होणार आहे. २ फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करावे लागणार आहे. त्यामुळे महापौर पदासाठी इच्छुक उमेदवारांनी आपले नाव पुढे रेटण्याचा प्रयत्न चालविला आहे. सध्या हारुण शिकलगार, किशोर जामदार, राजेश नाईक, सुरेश आवटी यांची नावे आघाडीवर आहेत. पहिल्यांदाच निवडून आलेले विजय घाडगे, निर्मला जगदाळे, रोहिणी पाटील, बसवेश्वर सातपुते यांनीही मोर्चेबांधणी सुरू केली आहे. इच्छुक उमेदवारांनी एकमेकांचा काटा काढण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी एकमेकांशी संधान साधून, तुला उमेदवारी मिळणार नसेल तर मला मदत कर, असे साकडे घातले जात आहे. त्यातून उर्वरित अडीच वर्षात दहा महिन्यांचा महापौर हा पर्यायही समोर आला आहे. तसे झाल्यास तीनजणांना महापौर पदाची संधी मिळू शकते. पण पहिल्यांदा मान कोणाचा? यावरून पुन्हा वादाला तोंड फुटणार आहे. महाआघाडीच्या काळात इद्रिस नायकवडी यांना एक वर्षाचा कालावधी दिला होता. पण नंतर त्यांनी महापौरपद सोडण्यास नकार दिला. हा इतिहास ताजा असल्याने, इच्छुकांनी आता नाही तर कधीच नाही, अशी भूमिका घेतली आहे. प्रबळ दावेदाराविरोधात इतर इच्छुक एकत्र येऊ लागले आहेत. त्यांच्यात चर्चेच्या फेऱ्याही झडू लागल्या आहेत. येत्या २१ जानेवारी रोजी काँग्रेस नगरसेवकांची बैठक होत आहे. या बैठकीला आमदार पतंगराव कदम व जयश्रीताई मदन पाटील उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत महापौर पदासाठी इच्छुक असलेल्यांच्या मुलाखतीही होतील. त्यामुळे नगरसेवकांनी आपलेच नाव नेत्यांसमोर घ्यावे, यासाठी इच्छुकांनी साम, दाम नीतीचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे या बैठकीकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे. त्यात आर्थिक तडजोडीत माहीर असलेल्या काही नगरसेवकांनी लक्ष्मीदर्शनाशिवाय पाठिंबा न देण्याचा निर्धार केला आहे. (प्रतिनिधी)