शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

महापौर पदासाठी वाढणार चुरस...

By admin | Updated: November 30, 2015 01:14 IST

इच्छुक सरसावले : गटा-गटात नगरसेवकांची विभागणी, नेत्यांकडे ‘फिल्डिंग’ सुरू

सांगली : महापालिकेच्या महापौर पदाचे डोहाळे लागलेल्या इच्छुकांनी आतापासूनच ‘फिल्डिंग’ लावण्यास सुरूवात केली आहे. नगरसेवकांना आपल्या तंबूत खेचण्यासाठी वेगवेगळे प्रयोग सुरू आहेत. त्यातून पालिकेत गटा-तटाच्या राजकारणाने डोके वर काढले आहे. एकीकडे नगरसेवकांना प्रलोभने दाखविली जात असताना, नेत्यांकडून आपल्याच नावावर शिक्कामोर्तब व्हावा, यासाठी मोर्चेबांधणी केली जात आहे. विद्यमान महापौर विवेक कांबळे यांची फेब्रुवारी महिन्यात मुदत संपणार आहे. महापौर पदाच्या निवडणुकीसाठी अजून दोन महिन्यांचा कालावधी आहे. तरीही आतापासूनच इच्छुकांची तयारी सुरू झाली आहे. महापालिकेत काँग्रेसची सत्ता असून त्यांच्याकडे ४२ नगरसेवक आहेत. पण काँग्रेसचे नेते मदन पाटील यांच्या निधनाने पालिकेतील सत्तासमीकरणाची दिशा हळूहळू बदलू लागल्याचे दिसून येते. पूर्वी मदनभाऊंचा शब्द अंतिम मानणारे नगरसेवक आता मात्र मोकाट सुटले आहेत. सत्ताधाऱ्यांत कुणाचा पायपोस कुणाला नाही. काँग्रेसचे दुसरे नेते आमदार पतंगराव कदम यांना मानणारा एक गट असला तरी, त्यांची ताकद कुणाच्या बाजूने राहणार, हेही पाहणे रंजक आहे. सध्या तरी पालिकेतील काँग्रेसचे बहुतांश नगरसेवक मदनभाऊंच्या पत्नी जयश्रीतार्इंचा शब्द मानणार, असे जाहीरपणे सांगतात. पण ऐनवेळी त्यातील काही नगरसेवक वेगळी भूमिका घेण्यासही मागेपुढे पाहणार नाहीत. त्यात पालिकेत काँग्रेस, राष्ट्रवादी, स्वाभिमानी आघाडीतील ४२ नगरसेवकांनी एकत्रित येत दबाव गट निर्माण केला आहे. हा गट महापौर पदाच्या निवडणुकीची प्रतीक्षा करीत आहेत. त्यातील काहीजण तर उघडरित्या तडजोडीच्या गोष्टी करू लागले आहेत. सध्या तरी दबाव गटाने शहराचा विकास हाच अजेंडा डोळ्यासमोर ठेवला असला तरी, या गटातील काहीजण मात्र अर्थपूर्ण तडजोडीत तरबेज आहेत. त्यांच्या प्रलोभनाला कितीजण बळी पडतात?, पक्ष, नेत्यांचे आदेश मानणार का? असे अनेक प्रश्न निवडणुकीच्या तोंडावर समोर येणार आहेत. महापौर पदासाठी इच्छुक असलेल्या नगरसेवकांनी आता सदस्यांची खेचाखेची सुरू केली आहे. आपल्याकडे किती नगरसेवक आहेत, हेच नेत्यांना दाखवून देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यातून सत्ताधारी गटात गटा-तटाच्या राजकारणाने जोर धरला आहे. आमका या गटाचा, तमका त्या गटाचा, अशी चर्चाही रंगली आहे. नेत्यांनीही आपल्याच नावावर शिक्कामोर्तब करावे, यासाठी इच्छुकांची धडपड सुरू आहे. त्यासाठी नेत्यांच्या मागे-पुढे करणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. पुढीलवर्षी होणाऱ्या महापौर पदाची रंगीत तालीम सुरू आहे. (प्रतिनिधी)राष्ट्रवादीची भूमिका निर्णायकमहापौर निवडीवेळी सत्ताधारी काँग्रेसमध्ये फाटाफुट निश्चित मानली जात आहे. स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत वेगळा प्रयोग राबविण्याचा प्रयत्न झाला. पण राष्ट्रवादीने काँग्रेसला छुपी मदत करण्याची हमी दिल्याने हा डाव फसला होता. पण महापौरपदासाठीचे इच्छुक यंदा मात्र थांबण्याच्या मुडमध्ये नाहीत. काँग्रेसमध्ये फूट पडली तर, मदनभाऊ गटाला सत्ता टिकविण्यासाठी प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसची मदत घ्यावी लागेल. मदनभाऊ हयात असताना त्यांचे राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांच्याशी सूत जुळले होते. हाच धागा पकडून मदनभाऊ गटाचे नगरसेवक सत्ता कायम राहील, अशी आशा बाळगून आहेत. नायकवडी गट काय करणार?महापालिकेत इद्रिस नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली काम करणारा एक गट कार्यरत आहे. या गटाने मागासवर्गीय समिती सभापती निवडीवेळी ताकद दाखविली होती. आता महापौरपदाच्या निवडणुकीत या गटाची डोकेदुखी होणार, हे स्पष्ट आहे. नायकवडी गटही मॅजिक फिगर गाठण्याचा प्रयत्न करणार. संख्याबळाची जुळवाजुळव झाल्यास हा गटही चमत्कार करू शकतो.