शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
2
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
3
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
4
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
5
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
6
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
7
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
8
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
9
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
10
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
11
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
12
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
13
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
14
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
15
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
16
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
17
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
18
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
19
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
20
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?

महापौर बदला; अन्यथा आमचे राजीनामे घ्या

By admin | Updated: February 27, 2017 23:39 IST

काँग्रेस नगरसेवक आक्रमक : नेत्यांशी चर्चा करून लवकरच निर्णय घेण्याची ग्वाही

सांगली : महापौर हारुण शिकलगार यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करीत सोमवारी काँग्रेसच्या नगरसेवकांनी त्यांच्या राजीनाम्यासाठी जयश्रीताई मदन पाटील यांना साकडे घातले. मदनभाऊ गटातील १५ नगरसेवक महापौरांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक झाले आहेत. त्यांचा राजीनामा घ्या नाही तर आमचे राजीनामे देऊ, अशी उघड भूमिका घेतल्याने काँगे्रस नेत्यांसमोर पेच निर्माण झाला आहे. अखेर राजीनाम्याबाबत सर्व नेत्यांशी चर्चा करून लवकरच निर्णय घेण्याची ग्वाही देत श्रीमती पाटील यांनी नगरसेवकांची समजूत काढली. महापौर शिकलगार यांना दहा महिन्यांचा कार्यकाल निश्चित करण्यात आला होता. पण सव्वा वर्षाचा कालावधी झाला तरी त्यांचा राजीनामा घेण्यात आलेला नाही. त्यात काँग्रेसअंतर्गत फाटाफुटीमुळे महापौरांना लॉटरी लागणार, अशीच चर्चा होती. पण आता काँग्रेसमधील मदनभाऊ गटाने महापौरांच्या कारभारावरच नाराजीचा सूर आळवला आहे. सोमवारी काँग्रेसच्या सांगलीतील १५ नगरसेवकांनी जयश्रीताई पाटील यांची भेट घेतली. यावेळी माजी महापौर कांचन कांबळे, माजी उपमहापौर प्रशांत पाटील-मजलेकर, प्रशांत पाटील, स्थायी समितीचे माजी सभापती राजेश नाईक, संतोष पाटील, नगरसेवक दिलीप पाटील, रोहिणी पाटील, पुष्पलता पाटील, शालन चव्हाण, शेवंता वाघमारे, प्रदीप पाटील, गुलजार पेंढारी आदी उपस्थित होते. या नगरसेवकांनी जयश्रीताई पाटील यांच्यासमोर महापौरांविरोधातील तक्रारींचा पाढा वाचला. महापौर शिकलगार हे विरोधकांची कामे गतीने करतात. त्यांच्या फायली मंजूर होत आहेत; पण सत्ताधारी गटाच्या नगरसेवकांची कामेच होत नाहीत. स्वत: महापौर व उपमहापौरांच्या प्रभागातील कोट्यवधी रुपयांच्या कामाची निविदा निघाली आहे, तर सर्वसामान्य नगरसेवक कामासाठी हेलपाटे मारत आहेत. मदनभाऊ गटातील नगरसेवकांना महापौरांकडूनच दुजाभावाची वागणूक दिली जात आहे. विरोधकांच्या इशाऱ्यावर त्यांचे कामकाज सुरू आहे, असा गंभीर आरोपही नगरसेवकांनी केला. नगरसेवकांची आक्रमक भूमिका पाहता जयश्रीताई पाटील यांनी महापौर शिकलगार व गटनेते किशोर जामदार यांनाही बैठकीसाठी बोलाविले. दोन्ही पदाधिकाऱ्यांसमोरच कारभाराचा सोक्षमोक्ष करण्याचा निर्णय घेण्यात आला. दोन्ही पदाधिकारी बैठकस्थळी आल्यानंतरही नगरसेवकांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी पालिकेचे अंदाजपत्रक सादर करताना गेल्या वर्षातील अनेक तरतुदी वगळल्या आहेत. नगरसेवकांना दिलेला २५ लाखांचा प्रभाग निधीही रद्द केला आहे. ही बाब बेकायदेशीर असतानाही त्यावर पदाधिकारी का मूग गिळून गप्प आहेत, असा प्रश्न उपस्थित केला. प्रशासनाला पाठीशी घातले जात आहे, असा आरोपही नगरसेवकांनी केला. पुढीलवर्षी महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्याला सामोरे जाताना शहरातील प्रलंबित प्रश्न प्राधान्याने सोडविण्याची गरज आहे. शिकलगार यांना दिलेला दहा महिन्यांचा महापौरपदाचा कालावधी संपला आहे. त्यामुळे दुसऱ्याला संधी देण्यासाठी त्यांचा राजीनामा घ्यावा. ते राजीनामा देणार नसतील, तर आमचे राजीनामे घ्या, असेही नगरसेवक म्हणाले. यावर जयश्रीताई पाटील म्हणाल्या की, महापौरांचा राजीनामा घेण्याबाबत आमदार पतंगराव कदम व कॉंग्रेसच्या इतर नेत्यांशी दोन दिवसांत चर्चा करू. या निवडीत पुन्हा दगाफटका होणार नाही, याचीही खबरदारी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे सर्व नेत्यांना विश्वासात घेऊन निर्णय होईल, असे स्पष्ट केले. (प्रतिनिधी)