शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

माऊली जमदाडे ‘अजिंक्यतारा केसरी’

By admin | Updated: March 30, 2017 23:32 IST

सोनूला दाखवले अस्मान : हजारो कुस्ती शौकिनांची उपस्थिती

सातारा : आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त शेंद्रे येथील अजिंक्यतारा साखर कारखाना कार्यस्थळावर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले मित्र मंडळातर्फे घेतलेल्या निकाली कुस्त्यांच्या जंगी मैदानात मुंबई महापौर केसरी माऊली जमदाडे याने आंतरराष्ट्रीय विजेता सोनू याला अस्मान दाखवून ‘अजिंक्यतारा केसरी’ या किताबावर आपले नाव कोरले. कुस्ती आखाड्याचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, विक्रमसिंहराजे भोसले, रवींद्र कदम, राजू भोसले, चंद्रकांत जाधव, कुस्ती कमिटीचे अध्यक्ष रामभाऊ जगदाळे, उत्तमराव पाटील, दिलीपराव निंबाळकर, किरण साबळे-पाटील, धर्मराज घोरपडे, राजाराम जाधव, बाजार समितीचे सभापती अ‍ॅड. विक्रम पवार, अजिंक्यतारा कारखान्याचे कार्यकारी संचालक संजीव देसाई यांच्या उपस्थितीत झाले. महाराष्ट्र चॅम्पियन अमोल फडतरे विरुद्ध आंतरराष्ट्रीय विजेता सुधीर कुमार, महाराष्ट्र चॅम्पियन मारुती जाधव विरुद्ध महान भारत केसरी योगेश बोंबाळे, महाराष्ट्र चॅम्पियन गोकुळ आवारे विरुद्ध कर्नाटक केसरी कार्तिक काटे, महाराष्ट्र चॅम्पियन श्रीपती कर्णवर विरुद्ध राष्ट्रवादी केसरी विजय घुटाळ या प्रत्येकी एक लाखाच्या पाच कुस्त्या झाल्या. महाराष्ट्र चॅम्पियन विलास डोईफोडे विरुद्ध महाराष्ट्र चॅम्पियन गणेश जगताप, महाराष्ट्र चॅम्पियन रवी शेडगे विरुद्ध महाराष्ट्र चॅम्पियन संग्राम पाटील, नॅशनल विजेता सोमवीर विरुद्ध महाराष्ट्र चॅम्पियन संतोष दोखड, त्रिमूर्ती केसरी सुनील शेवतकर विरुद्ध महाराष्ट्र चॅम्पियन पोपट घोडके, नॅशनल चॅम्पियन शैलेश शेळके विरुद्ध महाराष्ट्र चॅम्पियन संतोष लवटे अशा लाखाची बक्षिसे असलेल्या ९० कुस्त्या रंगतदार झाल्या. सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, पंजाब, हरियाणा, दिल्ली आदी ठिकाणच्या नामवंत मल्लांनी मैदान गजबजले. खास आकर्षण असलेल्या मुंबई महापौर केसरी माऊली जमदाडे विरुद्ध आंतरराष्ट्रीय विजेता सोनू ही प्रथम क्रमांकाची कुस्ती आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या हस्ते आणि विक्रमसिंहराजे भोसले, संजीवराजे नाईक-निंबाळकर, वसंतराव मानकुमरे, रवींद्र कदम, राजू भोसले यांच्या उपस्थितीत लावण्यात आली. दोन्ही मल्लांनी चलाखी दाखवून एकमेकांवर झडप घेतली. दोघेही कसदार पैलवान असल्याने कोण जिंकणार लक्ष लागले होते. माऊली जमदाडेने अचूक चढाई करत सोनूला अस्मान दाखवले. दोन नंबरची कुस्ती अमोल फडतरे आणि सुधीर कुमार ही बरोबरीत झाली. तीन नंबरला मारुती जाधववर योगेश बोंबाळे याने मात केली. चौथ्या कुस्तीत गोकुळ आवारे आणि कार्तिक काटे यांच्यात रंगतदार लढत झाली. (प्रतिनिधी)