शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान अखेर जिंकला, पण संथ खेळीमुळे खड्ड्यात राहिला; १४ षटकांत जिंकायचं होतं, पण... 
2
महायुती सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करा; काँग्रेसची राज्यपालांकडे मागणी
3
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचा मुलगा हंटर बायडेन दोषी, फेडरल गन प्रकरणात कोर्टाचा मोठा निर्णय
4
शाकाहरीबाबत तुमचं मत काय? जैन मुनींच्या प्रश्नावर शरद पवारांचं एका वाक्यात उत्तर
5
PM Narendra Modi : सोशल मीडियावरून 'मोदी का परिवार' आता हटवा; पंतप्रधान नरेंद्र मोदींची विनंती
6
भाजपचे धक्कातंत्र! पुन्हा नवीन चेहऱ्याला संधी, मोहन माझी यांना ओडिशाचे मुख्यमंत्रिपद दिले
7
स्पर्धेबाहेर होण्याच्या भितीने पाकिस्तानची कामगिरी सुधारली; जॉन्सनच्या तडाख्याने हुडहुडी भरली
8
Fact Check: मोदींविरोधात घोषणा देणारी महिला कंगनाला मारणाऱ्या CISFची आई नाही!
9
Vande Bharat मध्ये शिरले शेकडो विना तिकीट प्रवासी; video व्हायरल होताच नेटकरी भडकले...
10
युवराज सिंगकडून पाकिस्तानच्या पराभवानंतर शाहिद आफ्रिदीचं सांत्वन, भन्नाट Video 
11
एक हिरो, एक हिरोईन अन् रहस्यमय मर्डर; तपासात सत्य बाहेर येताच पोलीसही हैराण
12
MMS लीक होताच खचली! निवडणुकीमुळे पुन्हा चर्चेत आली; भोजपुरी क्वीनचा बोल्ड अंदाज
13
Aadhar Card : तुमच्या आधार कार्डचा कुठे-कुठे वापर झाला; सोप्या पद्धतीने हिस्ट्री तपासा
14
वाफाळलेल्या चहासोबत गरमागरम भजी आणि बिस्किट खाताय?; 'हे' फूड कॉम्बिनेशन हानिकारक
15
"पाकिस्ताननं आता पुरूष संघांविरूद्ध खेळू नये कारण...", माजी खेळाडूची बोचरी टीका!
16
अजित पवारांच्या NCP चा नेता 'शिवतीर्थ'वर; राज ठाकरेंसोबत केली चर्चा, नेमकं काय घडतंय?
17
कुठे गायब आहे 'जुम्मा-चुम्मा' गर्ल?, ३२ वर्षांपासून आहे कलाविश्वापासून दूर
18
जेलमधून घरी पोहचला युवक, दरवाजा उघडताच पायाखालची जमीन सरकली; नेमकं काय घडलं?
19
२४ वर्षापासून वर्क फ्रॉम होम करायचे मुख्यमंत्री; आता नव्या CM साठी बंगल्याची शोधाशोध
20
Mallikarjun Kharge : "दुसऱ्यांच्या घरातून खुर्च्या उधार घेऊन..."; मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

मातोश्री पेट्रोलपंपात भेसळ झाल्याचे स्पष्ट-- विजय काळम :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 12:01 AM

सांगली : माधवनगर रस्त्यावरील बायपासजवळ असणाºया मातोश्री पेट्रोल पंपावरील पेट्रोलमध्ये भेसळ असल्याचा अहवाल

ठळक मुद्देपरवाना निलंबनाची शिफारसया पेट्रोल पंपाचा परवाना रद्द करण्याची शिफारस कंपनीकडे करणार

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : माधवनगर रस्त्यावरील बायपासजवळ असणाºया मातोश्री पेट्रोल पंपावरील पेट्रोलमध्ये भेसळ असल्याचा अहवाल प्रयोगशाळेतून मंगळवारी प्राप्त झाला आहे. त्यामुळे या पेट्रोल पंपाचा परवाना रद्द करण्याची शिफारस कंपनीकडे करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी विजय काळम यांनी दिली.बायपास रस्त्यावर महेंद्र भालेराव (रा. जळगाव) यांचा मातोश्री पेट्रोलपंप आहे. महिन्याभरापूर्वी त्यांनी हा पंप चालविण्यासाठी घेतला आहे. या पंपावरील पेट्रोलमध्ये भेसळ होत असल्याची तक्रार जिल्हाधिकाºयांकडे करण्यात आली होती. या तक्रारीची गंभीर दखल जिल्हाधिकाºयांनी घेतली. २६ सप्टेंबरला सकाळी साडेनऊच्या सुमारास जिल्हाधिकारी काळम-पाटील व निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी यांनी पंपावर छापा टाकला होता. त्यानंतर जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे, जिल्हा पुरवठा अधिकारी भानुदास गायकवाड, वैध मापन निरीक्षक आर. पी काळकुटे, भारत पेट्रोलियमचे विक्री व्यवस्थापक जे. एस. जोसेफ असे प्रमुख अधिकारी कर्मचाºयांसह पंपावर दाखल झाले होते.सुमारे तीन तासांहून अधिक काळ पंपाची तपासणी सुरू होती. यावेळी पेट्रोल भरण्याच्या यंत्रामधील सील तोडले असल्याचे उघडकीस आले होते. दरम्यान, पेट्रोलची घनता तपासली असता, तीही नियमापेक्षा अधिक असल्याचे समोर आले होते. ७४० ते ७४६ पर्यंत आवश्यक असणारी घनता ७६८ पर्यंत असल्याचे समोर आले होते. त्याचवेळी इंधनामध्ये भेसळ होत असल्याचे स्पष्ट झाले होते. तसेच तेथील पेट्रोलचा रंग काळपट असल्याचे निदर्शनास आले होते. पंपावरील स्टॉक रजिस्टरदेखील अद्ययावत नव्हते. अन्य त्रुटी यावेळी आढळून आल्या होत्या. त्यामुळे जिल्हा प्रशासनातर्फे पंपावरील पेट्रोलचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते.त्याचा अहवाल मंगळवारी सायंकाळी प्रशासनास प्राप्त झाला. यामध्ये प्रशासनाने व्यक्त केलेला अंदाज बरोबर ठरला. अनेक बाबींमध्ये दोष आढळत पेट्रोलमध्ये भेसळ होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सांगलीतील या पंपाचा परवाना रद्द करण्याची शिफारस संबंधीत कंपनीकडे बुधवारी करण्यात येणार असल्याचे विजय काळम यांनी सांगितलेपंपचालकांमध्ये खळबळअचानक झालेल्या या कारवाईमुळे जिल्ह्यातील पेट्रोलपंप चालकांत खळबळ उडाली होती. त्यानंतर कारवाई काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता तपासणीत भेसळ स्पष्ट झाल्यामुळे परवाना रद्दची कारवाई केली जाणार आहे. जिल्ह्यातील ज्या पेट्रोलपंपांबद्दल तक्रार येईल, त्याठिकाणी तपासणी करण्याची व दोष आढळल्यास कारवाईची जिल्हा प्रशासनाची भूमिका असल्याने पंपचालकांत खळबळ माजली आहे.