शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

कुपवाडला मटकाबुकीचा अड्डा उद‌्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:10 IST

सांगली : कुपवाड (ता. मिरज) येथील मटका बुकीच्या अड्ड्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने छापा टाकून रोख रकमेसह २ ...

सांगली : कुपवाड (ता. मिरज) येथील मटका बुकीच्या अड्ड्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने छापा टाकून रोख रकमेसह २ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी बुकीचालकासह सहाजणांना अटक करण्यात आली आहे.

अटक करण्यात आलेल्यांत बुकीचालक झाकीर बाबासाहेब मुजावर (वय ४८, रा. बसस्थानकाजवळ, कुपवाड), शकील नसीसाब ढोले (३४, उल्हासनगर), रज्जब मुसा मुजावर (३६, समतानगर), भीमराव बाबूराव शिंदे (६६, समतानगर), दशरथ रामचंद्र जावळे (६०, रा. समतानगर), नासीर कासीम मुश्रीफ (४२, रा. मुजावर गल्ली, मिरज) या सहाजणांचा समावेश आहे.

पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कारवाईचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांना दिले आहेत. गायकवाड यांनी त्यासाठी विशेष पथक नियुक्त केले आहे. गुरुवारी एलसीबीचे पथक मिरज विभागात पेट्रोलिंग करीत असताना कुपवाड एमआयडीसीमधील शिवशक्तीनगर येथे झाकीर मुजावर हा बुकीमालक याच्या घरात मटक्याचा हिशेब सुरू असल्याची माहिती मिळाली. एलसीबीच्या पथकाने मुजावर याच्या घरावर छापा टाकला. यावेळी घरात सहाजण मटका जुगार आकड्याचे मोबाईलवरून प्रिंट काढून हिशेब करीत असल्याचे आढळून आले. पथकाने त्यांच्याकडून मटक्याच्या चिठ्ठ्या, पेन, पॅड, प्रिंटर, स्कॅनर, १२ मोबाईल, दोन मोटारसायकलींसह ५५ हजार ४०० रुपयांची रोकड असा २ लाख ५८ हजार ९८४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. बुकीचालकासह सहाजणांवर गुन्हा दाखल करून सर्वांना कुपवाड एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस, उपनिरीक्षक अभिजित सावंत, सुधीर गोरे, इरफान मुल्ला, मुद्दसर पाथरवट, सोहेल कार्तीयानी, दीपक गिड्डे, विकास भोसले, वनीता चव्हाण, प्रियांका धुमाळ, बजरंग शिरतोडे यांनी भाग घेतला.