शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
3
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
4
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
5
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
6
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
7
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
8
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
9
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
10
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
11
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
12
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
13
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
14
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
15
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
16
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
17
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
18
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
19
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
20
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
Daily Top 2Weekly Top 5

'भविष्यात दुसरी श्रद्धा वालकर होऊ देणार नाही', लव्ह जिहादविरोधात सांगलीत हिंदू गर्जना मोर्चा

By संतोष भिसे | Updated: December 24, 2022 19:15 IST

घोषणांनी शहर दुमदुमून सोडले

सांगली : लव्ह जिहादविरोधी कायद्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांनी शनिवारी हिंदू गर्जना मोर्चा काढला. जिल्हाभरातून हजारो महिला व पुरुष सहभागी झाले. भविष्यात दुसरी श्रद्धा वालकर होऊ देणार नसल्याचा इशारा मोर्चेकऱ्यांनी दिला.राम मंदिर चौकातून सुरु झालेल्या मोर्चामध्ये अखंड घोषणा सुरु होत्या. भगव्या टोप्या घातलेल्या आणि भगवे ध्वज घेतलेल्या महिला अग्रभागी होत्या. लव्ह जिहादविरोधी कायदा झालाच पाहिजे अशा घोषणांनी शहर दुमदुमून सोडले. पंचमुखी मारुती रस्ता, रिसाला रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, मारुती रस्ता, कापड पेठ, गणपती मंदिर, गणपती पेठ, शहर पोलीस ठाणे यामार्गे मोर्चा स्टेशन चौकात आला. तेथे पाच युवती व प्रमुख वक्त्यांची भाषणे झाली. तरुणींच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. लव्ह जिहाद व धर्मांतरविरोधी कायद्याची मागणी केली.मोर्चाचे नेतृत्व आमदार सुधीर गाडगीळ, नितीन शिंदे, नितीन चौगुले, स्वाती शिंदे, मकरंद देशपांडे, निशिकांत पाटील, पृथ्वीराज पवार, नीता केळकर, संगीता खोत, भारती दिगडे, शेखर इनामदार, ओंकार शुक्ल, दिनकर पाटील, मनोहर सारडा आदींनी केले. भाजपच्या नगरसेवकांसह बजरंग दल, शिवसेना, हिंदू एकता आंदोलन आदींचे कार्यकर्ते सहभागी झाले.   दुसरी श्रद्धा वालकर होणार नाहीमाजी आमदार नितीन शिंदे म्हणाले, हिंदू एकवटला तर दुसरी श्रद्धा वालकर होणार नाही. सरकारने आजच्या मोर्चाची दखल घेऊन लव्ह जिहादविरोधी कायदा त्वरित करावा. महाविद्यालये, शिकवण्यांसमोर मुलींना हेरण्यासाठी विशिष्ट धर्मीय मुले थांबणार नाहीत याची दक्षता घ्यावी.

टॅग्स :SangliसांगलीLove Jihadलव्ह जिहादHinduहिंदू