शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

शिंगणापूर घाटात सामूहिक अत्याचार; आरोपीस कोठडी

By admin | Updated: March 13, 2017 23:08 IST

शिंगणापूर घाटात सामूहिक अत्याचार; आरोपीस कोठडी

शिंगणापूर : शिखर शिंगणापूरच्या घाटात प्रेमीयुगुलाचे धाकाने नग्न शूटिंग काढून नंतर तरुणीवर सामूहिक अत्याचार केल्याप्रकरणी नातेपुते येथे अटक करण्यात आलेल्या आरोपीला पोलिस कोठडी देण्यात आली आहे. दरम्यान, या गंभीर गुन्ह्यातील दुसरा आरोपी अद्याप फरार असून, त्याचा शोध नातेपुते पोलिस घेत आहेत. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, माळशिरस तालुक्यातील एका महाविद्यालयात शिकणारे प्रेमीयुगुल वर्गाला दांडी मारून शिंगणापूर येथे बुधवार, दि. ८ रोजी फिरावयास आले होते. शिंगणापूर-नातेपुते रस्त्यावरून ते माघारी येत असताना नातेपुते येथील सुनील मारुती माने व त्याच्या मित्राने दोघांना धाक दाखवून अर्धा किलोमीटर अंतरावर आडोशाला नेऊन त्यांना मारहाण करून व धाक दाखवून कपडे काढण्यास भाग पाडले व त्यानंतर अश्लील कृत्य करण्यास भाग पाडून स्वत:च्या मोबाईलमध्ये शूटिंग काढले. यानंतर या नराधमांनी मुलीवर अत्याचार केला व तिच्या अंगावरील सोन्या-चांदीचे दागिने व दोघांचे मोबाईल काढून घेतले. मोबाईलमधील व्हिडिओ क्लिप डीलिट करण्यासाठी दुसऱ्या दिवशी या घटनेतील मुलीच्या मित्राला फोन करून दहा हजारांची खंडणी मागितली असता मित्राने ‘पैसे देतो,’ म्हणून सुनील माने यास अकलूजला बोलावून घेतले व आपल्या इतर मित्रांच्या सहकार्याने तेथे त्याची यथेच्छ धुलाई केली असता जीव वाचविण्यासाठी त्याने नातेपुते पोलिस स्टेशनला फोन करून ‘अकलूज येथे मला मारहाण होत आहे,’ पोलिस संरक्षणाची मागणी केली. नातेपुते पोलिसांनी तातडीने यासंदर्भात अकलूज पोलिस स्टेशनला कळविले व माने यास ताब्यात घेण्यास सांगितले. सुनील माने यास अकलूज येथे मारहाण करण्याचे कारण काय असावे, अशी शंका नातेपुते पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरक्षिक सुनील खेडेकर यांना आल्याने त्यांनी तातडीने अकलूज येथे जाऊन चौकशी केली असता हा प्रकार उघड झाला असून, यासंदर्भात नातेपुते पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील माने यास अटक करण्यात आली आहे व त्याच्या फरारी साथीदाराचा तपास सहायक पोलिस निरीक्षक खेडेकर, फौजदार देवकाते व जाधव करीत आहेत. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मंगळवेढ्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी जगदाळे यांनी नातेपुते पोलिस स्टेशनला भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली व तपासाबाबत योग्य त्या सूचना केल्या. यातील मुख्य आरोपी सुनील माने हा सराईत गुन्हेगार असून, दोन वर्षांपूर्वी नातेपुते पोलिस स्टेशनचे तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय खाडे यांनी त्याच्याविरोधात हद्दपारीचा प्रस्ताव पाठविला होता. (वार्ताहर)