शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
3
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
4
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
5
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
6
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
7
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
8
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
9
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
10
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
11
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
12
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
13
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
14
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
15
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार
16
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
17
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
18
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
19
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
20
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?

विवाह नोंदणीत सांगलीकर उदासीन

By admin | Updated: November 23, 2014 23:55 IST

नोंदणीचे प्रमाण केवळ ४० टक्केच : रजिस्टर विवाह पध्दतीमध्ये वाढ

नरेंद्र रानडे - सांगली -जिल्ह्यात विवाहाची नोंदणी करण्याबाबत वधू-वर जागरुक नसल्याचे चित्र आहे. महापालिका क्षेत्राचा विचार केल्यास, विवाह नोंदणीचे प्रमाण अवघे ४० टक्के आहे. नोंदणी (रजिस्टर) पद्धतीने विवाह करण्यामध्ये मात्र मागील वर्षीपेक्षा यंदा १५ टक्के वाढ झाली आहे. शासकीय कार्यालयातील विवाह नोंदणी कार्यालयात प्रत्येक विवाहित जोडप्याने विवाहाची नोंदणी करणे बंधनकारक आहे. थाटामाटात लग्न करण्याकडे अद्यापही अनेकांचा कल असला तरी, नोंदणी पद्धतीने पध्दतीने विवाह करण्याच्या प्रमाणातही वाढ होत आहे. याकरिता विवाहाच्या एक महिना अगोदर इच्छुक विवाहितांना प्रशासकीय कार्यालयास नोटीस द्यावी लागत असल्याने, या प्रकारच्या विवाहाची १०० टक्के नोंदणी होत आहे. विवाहाचा अनावश्यक खर्च वाचविण्याची मानसिकता असणारे नोंदणी पध्दतीलाच प्राधान्य देत आहेत. येथील विवाह अधिकारी कार्यालयात १ जानेवारी ते २० नोव्हेंबर २०१४ या कालावधित जिल्ह्यातील १७५ जणांनी रजिस्टर विवाह केल्याची नोंद आहे. मागील वर्षीपेक्षा यंदा यामध्ये १५ टक्के वाढ झाली आहे. विवाहाची नोंदणी न केल्यास भविष्यात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते, याची कल्पना असूनही मंगल कार्यालयात विवाह करणारे कित्येकजण नोंदणी करीत नाहीत. नोंदणी करावी याकरिता प्रशासनाच्यावतीने जनजागृती सुरू आहे. १ जानेवारी ते २० नोव्हेंबर २०१४ या कालावधित महापालिका क्षेत्रात सरासरी ११०० जोडप्यांनीच विवाह नोंदणीकरिता महापालिकेच्या पायऱ्या चढल्या आहेत. नोंदणी कार्यालयाच्या माहितीनुसार हे प्रमाण केवळ ४० टक्के आहे. विवाह झाल्यानंतर नोंदणीकडे दुर्लक्ष करणारे, प्रशासकीय कामात अडचणी आल्या की, हमखास नोंदणी करण्याकरिता येत असल्याचे चित्र आहे. २००७ पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील विवाह अधिकाऱ्यांकडे विवाह नोंदणी करण्याची व्यवस्था होती. परंतु महाराष्ट्र विवाह मंडळाचे विनियमन व विवाह नोंदणी अधिनियम १९९८ अन्वये नोंदणी प्रक्रियेचे विकेंद्रीकरण करण्यात आले. त्यामुळे महापालिका, ग्रामपंचायत, नगरपालिका यांना नोंदणीचे अधिकार दिले आहेत. या कायद्याच्या अंमलबजावणीस १ मे २००८ पासून प्रारंभ झाला आहे. ही बाब विवाहितांसाठी सोयीची असूनही नोंदणीबाबत उदासीनताच दिसून येत आहे.विवाह नोंदणी करणे गरजेचेविवाहाची कायदेशीर नोंदणी न केल्यास प्रामुख्याने पत्नीला भविष्यकाळात वारसा हक्क, पेन्शनचा लाभ, विमा मिळणे, पासपोर्ट काढणे आदी बाबींमध्ये अडचणी निर्माण होतात. त्यामुळे प्रत्येक विवाहित जोडप्याने कौटुंबिक जीवनात स्थैर्य राखण्यासाठी विवाह नोंदणी करणे गरजेचे आहे, असे मत महापालिका सहायक आयुक्त रमेश वाघमारे यांनी व्यक्त केले.