शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

कुपवाडमधील विवाहितेचा स्वाईन फ्लूने मृत्यू

By admin | Updated: March 23, 2017 23:46 IST

कुपवाडमधील विवाहितेचा स्वाईन फ्लूने मृत्यू

कुपवाड : कुपवाड-माधवनगर रस्त्यालगत असलेल्या प्रकाशनगरमधील वर्षा दत्तात्रय राऊत (वय ३५, रा. दुसरी गल्ली) या विवाहितेचा बुधवारी (दि. २२) रात्री साडेअकरा वाजता खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना स्वाईन फ्लूने मृत्यू झाला.प्रकाशनगरमधील वर्षा राऊत या महिलेला महिन्यापूर्वी सर्दी, ताप, अंगदुखी असा किरकोळ आजार सुरू झाल्याने नातेवाइकांनी सुरुवातीला सांगलीतील शासकीय रूग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर माधवनगर, यशवंतनगरमधील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले, परंतु त्यांच्यात सुधारणा झाली नाही. त्यामुळे नातेवाइकांनी त्यांना शनिवार, दि. १८ रोजी वानलेसवाडी येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांच्यावर पाच दिवस उपचार सुरू होते. बुधवारी (दि. २२) दुपारी त्यांना स्वाईन फ्लू झाल्याचे वैद्यकीय तपासात निष्पन्न झाल्याचे डॉक्टरांनी नातेवाइकांना सांगितले. तेथेच उपचार सुरू असताना बुधवारी रात्री साडेअकरा वाजता त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पती, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. स्वाईन फ्लूने महिलेचा मृत्यू झाल्याने प्रकाशनगर परिसरात घबराट निर्माण झाली आहे.