शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

तासगावात आरक्षित जागांचा बाजार

By admin | Updated: April 20, 2016 00:33 IST

बेकायदा बांधकामे : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरपालिका कारभाऱ्यांचे कारनामे चव्हाट्यावर

दत्ता पाटील--तासगाव नगरपालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर पालिकेतील कारभाऱ्यांचा कारभारही चव्हाट्यावर येत आहे. शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी आरक्षित ठेवलेल्या जागा नगरसेवकांकडूनच लाटल्या जात असल्याचा भांडाफोड काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महादेव पाटील यांनी केला. त्यांनी दिलेले उदाहरण नमुने दाखल म्हणावे लागेल. मात्र शहरातील अनेक आरक्षित जागांवर खुलेआमपणे बेकायदा बांधकाम आणि टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या आहेत. काही जागा नगरसेवकांनी, तर काही नगरसेवकांच्या बगलबच्च्यांनी बळकावलेल्या आहेत. त्यामुळे पालिकेतील काही कारभाऱ्यांचा कारभार स्वत:चे हित साधण्यापुरताच मर्यादित राहिल्याचे चित्र आहे. जागा बळकावण्याच्या उद्योगाला प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष नेते आणि सत्ताधाऱ्यांचेही पाठबळ राहिलेले आहे. सत्ता स्वार्थाच्या मर्यादेमुळे नेत्यांनाही नगरसेवकांच्या कारभाराला लगाम घालणे अवघड झाल्याचे चित्र आहे.तासगाव शहरात विकासात्मक योजना राबविण्यासाठी पालिकेकडे स्वत:च्या मालकीची जागा नाही. अनेक जागांवर आरक्षण असूनदेखील केवळ जागा नसल्यामुळे अनेक योजना प्रत्यक्षात अमलात आणता येत नसल्याचे चित्र आहे. पालिकेच्या कारभाराचे भीषण चित्र काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महादेव पाटील यांनी जनतेसमोर आणले. अर्थात कारभाऱ्यांच्या कारभाराचे प्रताप तासगावकर जनतेला नवखे आहेत, असेही नाही. नागरिकांच्या सोयीसाठी पालिकेने शहराचा विकास आराखडा राबवताना, अनेक ठिकाणी शहरातील महत्त्वाच्या जागा आरक्षित केल्या होत्या. मात्र या आरक्षित जागांचा विकास पालिकेकडून झाला नाही. याउलट बहुतांश नगरसेवकांनी आरक्षित जागांवर डल्ला मारण्याचे उद्योग केले. काहींनी स्वत: डल्ला न मारता अतिक्रमणधारकांकडून अप्रत्यक्ष डल्ला मारण्याचे उद्योग केले.पालिकेत गेल्या काही महिन्यांपासून भाजपची सत्ता आहे. या सत्तेत असणाऱ्या काही कारभाऱ्यांनी मोक्याच्या जागा हडप केल्या आहेत. किंंबहुना पालिकेतील सत्तेचा पूर्वेतिहास पाहिल्यास प्रत्येकवेळी सत्तेत असणाऱ्या काही नगरसेवकांकडून भूखंडाचे श्रीखंड घशात घालण्याचे उद्योग केलेले आहेत. माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांची स्वबळावर सत्ता असताना, आता खासदार संजयकाका पाटील यांची स्वबळावर सत्ता असताना, आबा-काका गटाची तसेच काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असतानादेखील बेकायदा जागांवर अतिक्रमणाचे उद्योग सुरूच होते.श्रीपाद व्यायाम मंडळाची ३५ गुंठे जागाही शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी आहे. या सर्वच जागेवर बेकायदेशीर इमारत उभारण्यात आलेल्या आहेत. यापूर्वी या जागेवरील बेकायदेशीर इमारत पाडण्याचे आदेश तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र राजकीय हितसंबंधांतून कोणतीच कारवाई झालेली नाही. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करणार आहे. मुख्याधिकाऱ्यांनीही ही जागा आरक्षित असल्याचा खुलासा केला आहे. त्यामुळे कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता श्रीपाद व्यायाम मंडळाची जागा खुली करुन देण्यासाठी पुढाकार घ्यावा. - महादेव पाटील, तालुकाध्यक्ष, काँग्रेस.नगरसेवकांकडून पालिकेच्या आरक्षित जागा ढापण्याचे प्रकार निश्चित दुदैवी आहेत. पालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या कारभाराचा योग्यवेळी भांडाफोड केला जाईल. शहरातील पालिकेच्या मालकीच्या जागेवर झालेल्या बेकायदा बांधकामाबाबत कारवाई करण्याचे अधिकारी मुख्याधिकाऱ्यांना आहेत. शहरातील सर्वच बेकायदा बांधकामे काढण्याची मागणी राष्ट्रवादीच्यावतीने मुख्याधिकाऱ्यांकडे करणार आहोत. मुख्याधिकाऱ्यांनीही कोणाच्याही दबावाला बळी न पडता नियमानुसार कठोर कारवाई करायला हवी. अन्यथा या विरोधात आवाज उठवू. - अमोल शिंदे, नगरसेवक, राष्ट्रवादीराजकीय शब्दफेक : प्रश्न कारवाईचा...