शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, दुसऱ्यांदा म्हणाले...!
2
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
3
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
4
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
5
'हा' माणूस फक्त कुत्र्यांना फिरवून महिन्याला कमावतोय ४.५ लाख रुपये, बिझनेस आयडिया व्हायरल!
6
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
7
वाद झाला अन् मध्यरात्री... दापोलीत लहान भावाची धारदार शस्त्राने हत्या; उन्हवरे गाव हादरलं
8
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
9
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
10
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
11
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
12
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 
13
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
14
धक्कादायक: शिक्षकांना नियमित केले, परंतु आदेश तात्पुरते राहिले, तासिका व रोजंदारीवरच दिल्या नियुक्त्या
15
वनविभागात ‘आयएफएस’ पदांचा खेळ; आता ८ पीसीसीएफ, वनसंरक्षक पदाला कात्री आणि बदल्यांमध्ये सोय
16
"राणे कुटुंबाने खून केलेले लोक हिंदूंच होते, नितेश राणेंनी वडिलांना..."; मनसे नेत्यांचे खळबळजनक आरोप
17
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
18
पगारातून कापला गेलेला TDS आता सहज परत मिळणार, सरकार बदलणार नियम, कधीपासून लागू?
19
'डॉन ३' मधून विक्रांत मेस्सी बाहेर, 'बिग बॉस' विजेता अभिनेता बनणार व्हिलेन? नवी अपडेट समोर
20
सावधान, पावसाळ्यात सर्पदंशाचा धोका अधिक! कशी घ्याल स्वतःची काळजी?

दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी

By admin | Updated: October 28, 2016 23:56 IST

रात्री उशिरापर्यंत रस्ते फुललेले : सांगलीत ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; किरकोळ विक्रेत्यांचाही व्यवसाय तेजीत

 सांगली : आनंदाचे आणि चैतन्याचे प्रतीक असणाऱ्या दिवाळी सणाला उत्साहात सुरूवात झाली आहे. त्यामुळे आता बाजारपेठेत खरेदीसाठी हाऊसफुल्ल गर्दी झाली आहे. एरवी केवळ शनिवारच्या बाजारादिवशी असणाऱ्या गर्दीचा उच्चांक मोडत बाजारपेठेत गर्दी होत आहे. ग्राहकांचा वाढता प्रतिसाद पाहता, अनेक शोरूम्सनी रात्री उशिरापर्यंत सेवा सुरू ठेवली आहे. साहजिकच विविध सेल, आॅफर्स आणि डिस्काऊंटच्या झगमगाटात रस्त्यावरील किरकोळ विक्रेत्यांकडील खरेदीलाही मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. दरम्यान, शनिवारी आणि रविवारी आणखी गर्दी होणार असल्याने, शहरातील मुख्य बाजारपेठ फुलून जाणार आहे. दिवाळीच्या सणामुळे बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण आहे. गेल्या आठवडाभरापासून लोक खरेदीसाठी मोठ्या संख्येने बाहेर पडत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून तर गर्दीने उच्चांक गाठत हरभट रोड, कापडपेठ, बालाजी चौक, महापालिका चौक, मारूती रोड आदी प्रमुख बाजारपेठा गर्दीने फुलून गेल्या आहेत. शहरातील मॉल्सनीही दिवाळीनिमित्त विविध आॅफर्स जाहीर केल्या असून, मॉल्सही हाऊसफुल्ल आहेत. रेडिमेड गारमेंटसह रस्त्यावर अगरबत्तीपासून उटणे, लक्ष्मीपूजनाच्या पुस्तकांपासून ते रेडिमेड गारमेंटमधील हजारो प्रकारच्या व्हरायटी सध्या उपलब्ध आहेत. पणत्या, आकाशकंदील, फराळाची खरेदी अंतिम टप्प्यात आली असली तरी, अजूनही विद्युत माळा, पणत्यांची खरेदी होत आहे. शहरात मुख्य बाजारपेठांसह उपनगरांतही सुगंधी उटणे, साबण, सुगंधित तेल आदींचे स्टॉल उभारले असून यालाही ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सांगली शहराबरोबर, मिरज, कुपवाड शहरातही ग्राहकांची मोठी गर्दी आहे. (प्रतिनिधी)