शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समिती सुरू करणार ‘बळीराजा अ‍ॅप’

By admin | Updated: June 28, 2017 23:09 IST

प्रशांत शेजाळ : पीक, पाणी, खतांसह हवामान अंदाजाची माहिती शेतकऱ्यांना मिळणारं

लोकमत न्यूज नेटवर्क --सांगली : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने आधुनिक शेतीसह उत्पादन वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना माहिती देणारे ‘बळीराजा अ‍ॅप’ सुरु करण्यात येणार असल्याची माहिती सभापती प्रशांत शेजाळ यांनी दिली. पिकांचे पाणी व्यवस्थापन, हवामान अंदाज, खत व्यवस्थापन, रोगांचा अंदाज याबाबत शेतकऱ्यांना माहिती मिळणार आहे. पीक संवर्धन सल्ला आणि शासकीय योजनांची माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध होणार असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञान उपलब्ध होऊ लागले आहे. शेतीमध्येही अनेक बदल होत आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी माहिती तंत्रज्ञानावर आधारित शेती करण्यासाठी महत्त्वाचे साधन म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने बळीराजा अ‍ॅप सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. पुरातन काळापासून माहिती व दळणवळण शेतीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहे. बहुतेक शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेती करीत असल्याचे दिसते. नवीन तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांची श्रमिक कामे सहज होत आहेत. शेतीत कमी कष्टामध्ये जादा उत्पादन आणि गुणवत्ता वाढविण्याचे काम केले जाते. त्यामुळे माहिती तंत्रज्ञानावरील शेतीचे महत्त्व वाढू लागले आहे. बळीराजा अ‍ॅपमुळे संगणक तसेच मोबाईलवर सर्वसामान्य शेतकऱ्यांना वापरता येण्यासाठी अ‍ॅप्लिकेशन विकसित केले असून त्याची सुरुवात येत्या पंधरा दिवसात केली जाणार आहे. बळीराजा अ‍ॅपवर ऊस, द्राक्ष, डाळिंब, केळी, सोयाबीन, ज्वारी, हरभरा, गहू, ढबू मिरचीसह भाजीपाल्याबाबत लागवड करण्यापासून उत्पादन घेण्यापर्यंत आपल्याला संपूर्ण माहिती उपलब्ध होईल. हवामान अंदाजाची माहिती मिळणे, रोगांचा अंदाज, पाणी आणि खत व्यवस्थापन, पीक संवर्धनासाठी सल्ला, तसेच शासकीय योजनांची माहिती मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य किंमत मिळावी, तसेच त्यांची फसवणूक होऊ नये, अन्य बाजारात शेतीमालाचा दर पाहण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. बळीराजा अ‍ॅपवर संपूर्ण माहिती मराठी भाषेतून मिळणार आहे. अ‍ॅपवर शेतकऱ्यांच्या सूचनाही स्वीकारल्या जातील. अ‍ॅप वापरताना शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही, अशी तरतूद करण्यात आली आहे, असे सभापती शेजाळ यांनी सांगितले.