शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीचे संधिसाधू धोरण; जनतेचे विस्मरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:25 IST

दत्ता पाटील तासगाव : राज्यातील अनेक बाजार समित्यांनी कोविड रुग्णालये सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. मात्र सातत्याने वादग्रस्त ठरलेल्या ...

दत्ता पाटील

तासगाव : राज्यातील अनेक बाजार समित्यांनी कोविड रुग्णालये सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. मात्र सातत्याने वादग्रस्त ठरलेल्या आणि सक्षम असणाऱ्या तासगाव बाजार समितीने मात्र कोरोनाच्या संकटकाळात संधिसाधू धोरण अवलंबले आहे. तालुक्यातील अनेक रुग्ण उपचारासाठी धडपडत असताना समितीतील कारभाऱ्यांना मात्र जनतेचे विस्मरण झाल्याची टीका होत आहे. बाजार समितीने कोविड रुग्णालय सुरू करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

तासगाव बाजार समितीत राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आहे. बाजार समितीच्या संचालक मंडळाचा कारभार सुरुवातीपासूनच वादग्रस्त राहिला आहे. पाच वर्षांपूर्वी माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांचा ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या विस्तारित मार्केटचे काम मार्गी लावण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यासाठी गेल्या पाच वर्षांत कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च झाला. मात्र मार्केटचा प्रश्‍न मार्गी लागला नाही. एकीकडे वादग्रस्त कारभाराबाबत टीका होत असतानाच विद्यमान संचालक मंडळाला सलग दोन वेळा मुदतवाढीची लॉटरी लागली. मिळालेल्या मुदतवाढीचा कालावधी तरी किमान सामान्य जनतेसाठी सत्कारणी लागावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

काेराेनाच्या संकटकाळात तासगाव बाजार समितीने मात्र संधिसाधू भूमिका घेत डोळेझाक केली आहे.

राज्यातील बाजार समित्यांनी कोविड सेंटर्स उभारावीत, असे आवाहन पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले होते. त्याला प्रतिसाद देत अनेक बाजार समित्यांनी पणन संचालकांकडे निधी खर्चासाठी परवानगी मागितली होती. त्यानुसार १० लाखांवर सरप्लस असलेल्या बाजार समित्यांना सरप्लस रकमेतून खर्चाची परवानगी दिली आहे. त्यानुसार आठ बाजार समित्यांनी रुग्णालये सुरू केली आहेत; तर २२ बाजार समित्या रुग्णालये सुरू करणार आहेत.

तासगाव बाजार समितीदेखील आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे. बाजार समितीची वार्षिक उलाढाल दोन कोटींपेक्षा जास्त आहे; तर २५ लाखांपेक्षा जास्त सरप्लस आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी मनात आणले तर सुसज्ज कोविड रुग्णालय सुरू करणे बाजार समितीला अशक्य नाही. एकीकडे शासनाचे सहकार्य असतानाच, बाजार समितीशी बेदाणा उद्योगामुळे अडत दुकानादार, व्यापारी जोडले गेले आहेत. त्यांच्याकडूनही मदत उपलब्ध होऊ शकते.

चौकट

मुदतवाढ सत्कारणी लागेल

बाजार समितीचे विद्यमान संचालक मंडळ बरखास्त करण्याची शिफारस जिल्हा उपनिबंधकांच्या चौकशी अहवालात करण्यात आली होती. नेमके याच काळात राज्यात सत्ताबदल झाला. राष्ट्रवादी सत्तेत आली. पणनमंत्र्यांच्या वरदहस्तामुळे बरखास्तीची कारवाई टळली. त्यात कोरोनोच्या संकटामुळे दोनवेळा मुदतवाढ मिळाली. किमान या काळात कोरोना रुग्णालय सुरू केल्यास मिळालेली मुदतवाढ तरी सत्कारणी लागेल.