शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

कन्नडबहुल गावांत मराठी शाळा

By admin | Updated: May 24, 2017 23:35 IST

कन्नडबहुल गावांत मराठी शाळा

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जिल्ह्यातील जत तालुक्याच्या सीमाभागातील कन्नडबहुल भागातील २१ गावांत प्राथमिक मराठी शाळा सुरू करण्याचा ठराव जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत झाला. याबाबत राज्य शासनाकडे तातडीने पाठपुरावा करून, येत्या शैक्षणिक वर्षापासून शाळा सुरू करण्याबाबत राज्य सरकारशी संपर्क साधू, अशी माहिती अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी दिली. कर्नाटकात लोकप्रतिनिधींनी जय महाराष्ट्र अशा घोषणा दिल्याच्या निषेधार्थ जिल्हा परिषदेने कन्नडबहुल भागामध्ये मराठी शाळांचा निर्णय घेतला. जिल्हा परिषद स्थायी समितीची मासिक सभा अध्यक्ष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. उपाध्यक्ष सुहास बाबर, सभापती प्रा. सुषमा नायकवडी, अरुण राजमाने, तम्मणगौडा रवी, ब्रह्मदेव पडळकर, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने यांच्यासह खातेप्रमुख उपस्थित होते. कर्नाटकातील लोकप्रतिनिधींनी सभागृहात ‘जय महाराष्ट्र’ अशा घोषणा दिल्यास संबंधित लोकप्रतिनिधीचे पद रद्द करण्याच्या वादग्रस्त विषयानंतर जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीत हा निर्णय घेण्यात आला. सांगली, कोल्हापूर, ठाणे येथे त्याचे पडसाद उमटले होते. कोल्हापुरात तर शिवसेना कार्यकर्त्यांनी कर्नाटकातील एसटी बसेसवर ‘जय महाराष्ट्र’ असे रंगवले. जिल्हा परिषदेने कन्नडबहुल भागात आता पुन्हा मराठी माध्यमाच्या शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. सीमाभागात एकवीस शाळा सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला जाणार आहे. पाठपुरावा झाल्यास राज्य शासन काय निर्णय घेते, हे पाहावे लागणार आहे.खासगी कन्नड शाळांकडून अडवणूकसांगली जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीतही सीमाभागातील २१ गावांत मराठी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळातही तसा प्रयत्न झाला होता. तेथे मराठी माध्यमाच्या शाळा सुरू करण्यासाठी १०० टक्के अनुदान देण्यात येणार होते. सांगलीसह सोलापूर जिल्ह्यातही तसे प्रस्ताव मागवले. मात्र त्यावर अंतिम निर्णय झाला नाही. त्यात स्थानिक खासगी कन्नड शाळा संस्थाचालक अडवणूक करीत असल्याचे स्पष्ट झाले. कारण या निर्णयामुळे त्यांना गाशा गुंडाळावा लागणार होता. तेथे मराठी शाळांसाठी विद्यार्थी उपलब्ध असतानाही शाळा मात्र सुरू होऊ शकल्या नाहीत.