शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

मराठा समाजाचा सांगलीत २७ रोजी मोर्चा

By admin | Updated: September 5, 2016 00:09 IST

एकजुटीचा निर्धार : लाखो समाजबांधव एकत्रित येणार; इतर समाजातील लोकांनाही आवाहन

 सांगली : कोपर्डीतील अत्याचाराच्या घटनेचा निषेध आणि मराठा समाजाला आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मराठा समाजाच्यावतीने येत्या २७ सप्टेंबर रोजी मराठा क्रांती नावाने मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा रविवारी नियोजन बैठकीत करण्यात आली. या मोर्चाला जिल्ह्यातून लाखो मराठा बांधवांसह इतर समाजातील लोकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन बैठकीत करण्यात आले. नगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचाराचे पडसाद राज्यभरात उमटले आहेत. अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशी द्यावी, मराठा समाजातील नागरिकांवर खोटे आरोप करून त्यांच्यावर जबरीने अ‍ॅट्रॉसिटीअन्वये गुन्हे दाखल केले जातात व नंतर त्यांना ब्लॅकमेल केले जाते. इतर समाजाप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण द्यावे, यासह विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात येणार आहे. कोपर्डीसारखी घटना पुन्हा घडू नये, मराठा समाजावर अन्याय होऊ नये यासाठी मराठा समाजाने एकत्रित येणे गरजेचे असल्याचे मत मान्यवरांनी बैठकीत व्यक्त केले. माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील म्हणाले की, हा मोर्चा राजकीय पक्षविरहित आहे. मोर्चासाठी नियुक्त कमिटीकडून जी कामे दिली जातील, ती आम्ही पार पाडू. शिवसेनेचे पृथ्वीराज पवार म्हणाले की, इतर समाजावर अन्याय झाल्यावर मराठा समाजाने कधी त्यांना विरोध केला नाही. उलट त्यांच्या पाठीशी राहण्याचे काम केले. मराठा समाज एक होत आहे, हे मराठ्यांनाच कळू द्या. आशा पाटील म्हणाल्या की, कोपर्डीतील घटना पूर्वनियोजित होती. यापूर्वीही इतिहासात मराठ्यांची बदनामी करण्याच्या घटना घडल्या आहेत. त्याचा तरुणांनी अभ्यास करावा. ए. डी. पाटील म्हणाले, मोर्चाच्या नियोजनासाठी कोअर कमिटी स्थापन करावी. सर्व तालुकाध्यक्षांनी पूर्णवेळ काम करून मोर्चा यशस्वी करावा. शरद खराडे म्हणाले, प्रत्येक गावापर्यंत पोहोचण्याचे नियोजन करण्याची गरज आहे. पद्माकर जगदाळे म्हणाले की, मराठा समाजातील गोरगरीब कार्यकर्त्यांच्या मतावर अनेकांनी पदे भोगली आहे. त्यासाठी मराठा समाजाच्या सर्व राजकीय नेत्यांना मोर्चाला पाठबळ देण्यासाठी भाग पाडावे. वैभव शिंदे म्हणाले की, हा मोर्चा कुठल्या जातीच्या विरोधात नाही. राज्याला धसका बसेल, असा मोर्चा काढला जाईल. मोर्चादिवशी शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालयानांना सुटी द्यावी. यावेळी डॉ. संजय पाटील, श्रीनिवास पाटील, अरविंद तांबवेकर, तानाजीराव जाधव, महादेव साळुंखे, काका हलवाई, नगरसेवक युवराज बावडेकर, अभिजित भोसले, जिल्हा परिषद सदस्य शिवाजी डोंगरे, राष्ट्रवादीचे राहुल पवार यांच्यासह मराठा समाजातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते (प्रतिनिधी) युवतींमार्फत निवेदन बैठकीत मोर्चाचे नियोजन करण्यात आले. मोर्चाच्या अग्रभागी तरुणी, महिला असतील, पाच तरूणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देतील. मोर्चात सहभागी सर्वजण काळ्या फिती लावतील. मोर्चाच्या नियोजनासाठी कोअर कमिटीची स्थापना करण्यात येणार असून, पुढील बैठक ७ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. पाच लाखाची देणगी जमा या बैठकीत मोर्चाच्या नियोजनासाठी अनेकांनी देणगी जाहीर केली. जिल्हा परिषद सदस्य शिवाजी ऊर्फ पप्पू डोंगरे, राष्ट्रवादीचे राहुल पवार यांनी प्रत्येकी एक लाखाची देणगी दिली, तर इतर अनेकांनी १० हजारापासून २५ हजारापर्यंत देणगीची घोषणा केली. एकाचदिवशी तब्बल ५ लाख रुपये देणगीस्वरुपात जमा झाले. काही कार्यकर्त्यांनी स्वत:च्या गावातून मोर्चाला येणाऱ्या आंदोलकांच्या वाहतूक व जेवण, नाष्ट्याची जबाबदारी स्वीकारली.