शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

आयर्विन पुलावर घोंगावले मराठा वादळ

By admin | Updated: September 28, 2016 00:23 IST

सांगलीत क्रांती मोर्चा : सांगली-पेठ मार्गावर ६० हजार वाहने धावली; वाहतुकीची कोंडी

कसबे डिग्रज : सांगलीत आयोजित मराठा मोर्चासाठी मंगळवारी अभूतपूर्व ऐतिहासिक गर्दी झाली होती. सांगली-पेठ या राज्यमार्गावरून शिराळा तालुक्यातील मणदूर-कणदूरपासून वाळवा तालुका आणि मिरज पश्चिम भागातील सुमारे साठ हजार वाहने सांगली-पेठ मार्गावरून धावली. तसेच त्यामधून आलेल्या सहा लाख जनसमुदायाचे ‘मराठा भगवे वादळ’ सांगलीतील आयर्विन पुलावरून चालत सांगलीत दाखल झाले.सकाळी सात वाजल्यापासून परिसरातील स्वयंसेवक गटा-गटाने दुचाकीवरून येत होते. त्यानंतर आठपासून मोठ्या प्रमाणात जीप, ट्रॅक्स, टेंपो, लक्झरी बसेस यांसह अग्निशमन वाहनांमधूनही मोठ्या प्रमाणात मराठा तरुणाई मोर्चात सहभागी होण्यास येत होती. यामध्ये मोर्चाला जाणाऱ्यांची स्वयंशिस्त वाखाणण्याजोगी होती. स्वयंसेवकांच्या सूचनेला चांगला प्रतिसाद मिळत होता. त्यामुळे पोलिसांवर ताण नव्हता. सांगली बायपास टोलनाक्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी झाली होती. (वार्ताहर)01 कसबे डिग्रज येथील बलुतेदार समाजाने केळी वाटप केले. याचा स्वीकार विनम्रपणे माजी जि. प. उपाध्यक्ष सत्यजित देशमुख, शिवसेना सांगली जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांच्यासह सुमारे ४० हजार मोर्चेकरांनी केला.02आयर्विन पुलावरून सकाळी साडेआठ ते ११ पर्यंत सहा लाख अबाल-वृद्ध मराठा नागरिक, महिला, मुली चालत सहभागी झाल्या होत्या.03राजारामबापू फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी येताना मेसमधून जेवण सोबत आणले होते. त्यामध्ये संतोष मगर (हिंगोली), रवींद्र गवारे (अहमदनगर) यांच्यासह जिल्ह्याबाहेरील ३० विद्यार्थी होते.04लक्ष्मी फाटा ते टोलनाका सांगली मार्गावर दोन्ही बाजूने वाहनांची सुमारे चार किलोमीटर लांब रांग.