शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

मणेराजुरीचे स्टोनक्रशर बेकायदेशीरच

By admin | Updated: August 17, 2016 23:12 IST

अमित शिंदे यांची माहिती : पोस्ट चुकीची, कायदेशीर कारवाई करणार

तासगाव : मणेराजुरी येथील बेकायदेशीर स्टोनक्रशरबाबत प्रवीण जमदाडे, मोहन कोरे, बजरंग एरंडोले यांनी दाखल केलेल्या याचिकेमध्ये जिल्हा प्रशासनाने केलेल्या कारवाईबाबतचा अहवाल हरित न्यायालयात सादर करण्यात आला. याबाबत अ‍ॅड. अमित शिंदे यांनी माहिती दिली. याप्रकरणी तक्रारदारतर्फे अ‍ॅड. असीम सरोदे व अ‍ॅड. अमित शिंदे काम पाहत आहेत.तहसीलदार भोसले यांनी केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये मणेराजुरी येथे सुरु असलेल्या १० पैकी आठ स्टोनक्रशरना सील करण्यात आले आहे. सील तोडून स्टोनक्रशर सुरु करणाऱ्या मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, न्यायालयाने त्यांना चार दिवसांची कोठडीही दिलेली आहे. प्रशासनातर्फे वर्षाअखेरीस रॉयल्टीबाबत अहवालदेखील तयार केलेला आहे. परवानगीपेक्षा जास्त उत्खनन करणाऱ्या स्टोनक्रशरला नोटीसही दिलेली आहे. प्रतिज्ञापत्रासोबत १८ जूनरोजी सुजाता चौगुले यांना रॉयल्टीबाबत दिलेले पत्रदेखील हजर केले आहे. प्रतिज्ञापत्रामध्ये पुढे, शिवदत्त हा स्टोनक्रशर शिवाजी कोरे यांच्या घरापासून ६७० मीटर अंतरावर असल्याचे गुगल मॅपवरून दिसत असल्याचे म्हटले आहे. तसेच शिवाजी कोरे यांच्या घराची पडझड शिवदत्तमुळे झाल्याचे वाटत आहे, असे प्रथम नमूद करून त्यांनतर याबाबत केलेला पंचनामा हा दबावामुळे तयार केल्याबाबत अर्जुन साठे या गावकामगार तलाठ्याचे प्रतिज्ञापत्रदेखील हजर केलेले आहे. तसेच शिवाजी कोरे यांच्या घराची पडझड कशामुळे झाली, याबाबतची तांत्रिक माहिती नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. हे स्टोनक्रशर कायदेशीर असल्याचा अहवाल सादर केल्याबाबत सोशल मीडियावरून मेसेज फिरत आहेत. (वार्ताहर)अहवाल सादर : पुढील सुनावणी ८ सप्टेंबर रोजीहरित न्यायालयामध्ये मणेराजुरी (ता. तासगाव) येथील स्टोनक्रशरबाबतीत दाखल झालेल्या याचिकेमध्ये जिल्हाधिकारी, जिल्हा खणीकर्म अधिकारी, सांगली व तहसीलदार, तासगाव यांनी प्रतिज्ञापत्रावर सादर केलेल्या अहवालानुसार मौजे मणेराजुरी येथील स्टोनक्रशर यांना जिल्हा उद्योग केंद्र सांगली, महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ व महसूल विभागाचे बिगरशेती परवाने असून, सर्व परवाने व परवानग्या पडताळून पाहिल्या असता, ते सर्व कागदपत्रे रितसर असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले आहे. याबरोबर याचिकाकर्त्यांनी केलेले आरोप हे आकसापोटी असल्याचेही न्यायालयाच्या दृष्टीला आणून देण्यात आले आहे. हरित न्यायालयाने वरील सर्व बाबींची दखल घेतली असून, पुढील सुनावणी ८ सप्टेंबर रोजी होणार आहे.तसेच एकीकडे स्टोनक्रशरवर केलेल्या कारवाईची माहिती देत दुसरीकडे न्यायालयाची दिशाभूल करण्याच्या उद्देशाने संदिग्ध स्वरूपाचे प्रतिज्ञापत्र शपथेवर दाखल करणाऱ्या तहसीलदार सुधाकर भोसले यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचेदेखील अ‍ॅड. अमित शिंदे यांनी सांगितले