शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जाब विचारल्याशिवाय कारखानदार दर देणार नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:10 IST

मांगले : शेतकरी झोपेचे सोंग घेत आहेत, त्यामुळे साखर कारखानदार दरात आणि वजनात शेतकऱ्यांची लुबाडणूक करीत आहेत. कारखानदारांच्या मनमानीमुळे ...

मांगले : शेतकरी झोपेचे सोंग घेत आहेत, त्यामुळे साखर कारखानदार दरात आणि वजनात शेतकऱ्यांची लुबाडणूक करीत आहेत. कारखानदारांच्या मनमानीमुळे मिळेल तो दर मुकाट्याने घेण्यात शेतकरी धन्यता मानत आहेत, ही खेदाची बाब आहे. जाब विचारल्याशिवाय कारखानदार योग्य दर देणारच नाहीत. त्यामुळे शरद जोशीप्रणित शेतकरी संघटनेच्यावतीने सुरू असलेल्या जनप्रबोधन यात्रेच्या समारोपासाठी सातारा येथे मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन शेतकरी संघटनेचे संस्थापक रघुनाथदादा पाटील यांनी केले.

जनप्रबोधन यात्रेदरम्यान मांगले (ता. शिराळा) येथे आयोजित सभेत ते बोलत होते. ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांचे सरकार जाऊन आता कारखानदारांचे ठाकरे सरकार आले आहे. सराईत कारखानदारच मंत्रिमंडळात आहेत. त्यामुळे सर्वजण ठरवून शेतकऱ्यांची फसवणूक करताना दिसत आहेत. झोन बंदीविरोधात आम्ही आवाज उठवल्यामुळे झोनबंदी लागू झाली; मात्र कारखानदारांनी एकत्रित येऊन टगेगिरी केली आणि एकच दर ठरवून शेतकऱ्यांना आर्थिक संकटात टाकण्याचे षड‌्यंत्र रचले. मते देऊन निवडून दिलेले कारभारी शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत. शेतकऱ्यांची चाललेली लूट थांबविण्यासाठी आम्ही जनप्रबोधन यात्रा सुरू केली आहे; मात्र शेतकरी पुढे येताना दिसत नाहीत. तुम्ही हक्काचे पैसे न मागता गप्प बसला, तर पुढील काळात तुम्हाला आणखी खोल खड्डा खणण्यात कारखानदार मागेपुढे पाहणार नाहीत.

यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष हनुमंत पाटील, जिल्हा संघटक धनपाल माळी, शिवाजी नांदखेड, धनंजय कदम, किशोर पाटील यावेळी उपस्थित होते.