शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

गटबाजीमुळेच मणेराजुरीला संचालकपद नाही!

By admin | Updated: July 9, 2015 23:36 IST

रामानंद भारती सूतगिरणी : तासगाव बाजार समितीतही फटका बसण्याची शक्यता

अशोक जमदाडे - मणेराजुरी -राष्ट्रवादीतील गटबाजीमुळे मणेराजुरी (ता. तासगाव) गावाने स्वामी रामानंद भारती सूतगिरणीतील संचालक पदाची संधी गमावली. या गटबाजीचा फटका बाजार समिती निवडणुकीतही बसण्याची शक्यता आहे.मणेराजुरीला गटबाजी आणि पाडापाडीचा मोठा इतिहास आहे. त्यामुळे तालुक्यातील तासगावनंतर सर्वांत मोठ्या असणाऱ्या मणेराजुरी गावाला जिल्हा पातळीवर व तालुका पातळीवर पदापासून वंचित राहावे लागत आहे. सूतगिरणी निवडणुकीवेळी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी मणेराजुरीला संधी मिळणार असल्याचे उमेदवारांना सांगण्यात आले होते; पण ऐनवेळी नावे जाहीर करण्यात आली. त्यामध्ये मणेराजुरीला डावलण्यात आल्याने प्रचंड नाराजी पसरली. माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या कारकीर्दीत मणेराजुरीला मागील वेळी दोन पदे देण्यात आली होती. यंदा सूतगिरणीसाठी माजी संचालक दिलीप पवार, अशोक पवार व राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष खंडू पवार, माजी सरपंच बबनराव जमदाडे यांनी उमेदवारीची मागणी केली होती. दिलीप पवार यांना संधी मिळणार, अशी खात्री होती. त्यांचे नावही आघाडीवर होते; पण संख्या जास्त असल्याने चौघांनाही डावलण्यात आले.जिल्हा बँकेच्या निवडणुकीतही माजी संचालक जयवंतराव पाटील, सुभाष कांबळे व पंचायत समितीचे माजी सदस्य सतीश पवार यांनी अर्ज दाखल केले होते. राष्ट्रवादी व भाजपची युती झाल्यानंतर राष्ट्रवादीने सतीश पवार यांना उमेदवारी दिली. मणेराजुरीतील राष्ट्रवादीत सतीश पवार, दिलीप जमदाडे, योजना शिंंदे, स्वाती लांडगे यांचा एक गट आहे, तर दिलीप पवार, जयवंतराव पाटील, सुभाष कांबळे यांचाही जुना गट आहे. या दोन्ही गटांचे सूर जुळत नाहीत. मागील पंचायत समिती निवडणुकीत सतीश पवार यांनी राष्ट्रवादीत बंडखोरी करून दिलीप पवार यांचा पराभव केला होता. त्या पराभवाची सल त्यांच्या मनामध्ये होती. त्यामुळे त्यांनी जुन्या गटाला एकत्र करून जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सतीश पवार यांचा पराभव केल्याची चर्चा आहे. सूतगिरणीसाठी दिलीप पवार यांना संधी देण्यात येऊ नये म्हणून दुसऱ्या गटाने प्रयत्न केले असल्याचे बोलले जाते. या वादामुळे मणेराजुरीला डावलण्यात आले व १५ वर्षांपासून मिळत असणारे संचालकपद गमवावे लागले. आता बाजार समितीसाठी राष्ट्रवादी व भाजपची युती झाल्यास मणेराजुरीला पुन्हा फटका बसण्याची शक्यता आहे. वर्चस्व असूनही उपेक्षामणेराजुरीतील राष्ट्रवादीच्या सतीश पवार, दिलीप जमदाडे, योजना शिंदे, स्वाती लांडगे यांचे ग्रामपंचायत व विकास सोसायटीमध्ये निर्विवाद वर्चस्व असूनही वरिष्ठ पातळीवर या गटाला संधी देण्यात येत नाही, अशी खंत कार्यकर्त्यांत आहे.आम्हाला नाही, तर तुम्हालाही नाही!मणेराजुरीतील गटबाजी नेहमीचीच आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीवेळी संजयकाका पाटील राष्ट्रवादीत होते. त्यामुळे राष्ट्रवादीतील आर. आर. पाटील (आबा) गटाने संजयकाका पाटील यांच्याबरोबर युती केली होती. त्यावेळी मणेराजुरी जिल्हा परिषद गट संजयकाका यांच्या गटाच्या वाट्याला गेला होता. परिणामी आबा गटातील माजी सरपंच सुभाष शिंदे यांच्या पुढाकाराने राष्ट्रवादीत बंडखोरी झाली होती. या गटाने जिल्हा परिषदेला योजना शिंदे, तर पंचायत समितीला स्वाती लांडगे, विश्वास पाटील यांना उभे केले होते. त्या निवडणुकीत संजयकाकांच्या तिन्ही उमेदवारांचा पराभव झाला होता. त्याचा वचपा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत संजयकाका गटाने काढला व सतीश पवार यांचा पराभव झाला. ‘आम्हाला नाही, तर तुम्हालाही नाही’, या उक्तीप्रमाणे राष्ट्रवादीतील दोन्ही गट एकमेकांवर कुरघोड्या करत आहेत.