मांजर्डे : मांजर्डे (ता. तासगाव) येथे बैलगाडी विहिरीत पडून दत्तात्रय रामभाऊ शिंदे (वय ५०, मूळ गाव, वडाळी, ता. श्रीगोंदा,जि. अहमदनगर) या शेतमजुराचा मृत्यू झाला. या घटनेत बैलाला गंभीर दुखापत झाली. ही घटना रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. मांजर्डे-आरवडे रस्त्यालगत विठ्ठल मोहिते यांच्या शेतामध्ये दत्तात्रय शिंदे मजूर म्हणून कुटुंबियांसह रहात होते. रविवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान शिंदे यांनी एक्का बैलगाडी जुंपली. बैलाला गाडीला जुंपल्यानंतर तो लगेच उधळला. जवळच असणार्या ३५ फूट खोल विहिरीत शिंदे बैलगाडीसह पडले. या घटनेत जोराचा मार बसल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. बैलही गंभीर जखमी झाला आहे. शिंदे यांना बैलगाडीची हौस होती. त्यासाठी त्यांनी मोहिते यांना सांगून दोनच दिवसांपूर्वी नवीन बैलगाडी खरेदी केली होती. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. (वार्ताहर)
बैलगाडीसह विहिरीत पडून मांजर्डे येथील शेतमजूर ठार
By admin | Updated: May 27, 2014 01:22 IST