शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

मनीषा पाटील यांचा राजीनाम्यास नकार

By admin | Updated: January 3, 2016 00:57 IST

जिल्हा परिषद : अन्य पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

सांगली : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांसह चार सभापतींना दोन दिवसात राजीनामे देण्याचे आदेश सत्ताधारी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांनी दिले. त्यानुसार उपाध्यक्षांसह दोघा सभापतींनी शनिवारी ते दिले असून, अध्यक्षा आणि एक सभापती सोमवारी राजीनामा देणार आहेत. मात्र, कृषी व पशुसंवर्धन सभापती मनीषा पाटील यांनी राजीनाम्यास नकार दिल्यामुळे राजीनामा नाट्य रंगले आहे. त्यांचे पती तानाजी पाटील यांची नेत्यांनी मनधरणी केली, मात्र ती वाया गेल्याने नवीन पदाधिकारी निवडीचा पेच निर्माण झाला आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर, उपाध्यक्ष लिंबाजी पाटील, बांधकाम व आरोग्य समिती सभापती गजानन कोठावळे, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती मनीषा पाटील, महिला व बालकल्याण समिती सभापती पपाली कचरे, समाजकल्याण समिती सभापती उज्वला लांडगे या पदाधिकाऱ्यांचा सव्वा वर्षाचा कार्यकाल पूर्ण झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिंदे यांनी त्यांना राजीनामे देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार लिंबाजी पाटील, कोठावळे आणि कचरे यांनी शनिवारी सायंकाळी राजीनामे सुपूर्द केले. अध्यक्षा होर्तीकर आणि लांडगे सोमवारी शिंदे यांच्याकडे राजीनामे देणार आहेत. मात्र मनीषा पाटील यांनी राजीनामा देण्यास नकार दिला आहे. त्यांचे पती तानाजी पाटील यांची मनधरणी करण्यासाठी लिंबाजी पाटील, कोठावळे कृषी समितीच्या दालनात शनिवारी गेले होते. त्यांच्यात तासभर चर्चा झाली. यावेळी तानाजी पाटील म्हणाले की, आमदार अनिल बाबर यांनी सूचना दिल्यास मनीषा पाटील लगेच राजीनामा देतील. तुम्ही बाबर यांच्याशी चर्चा करा. तानाजी पाटील यांचे मन वळवण्याचे प्रयत्न सायंकाळपर्यंत सुरू होते. चर्चा असफल ठरल्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांपुढे पदाधिकारी निवडीचा पेच निर्माण झाला आहे. श्रेष्ठींनी शब्द पाळावा : पाटील जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद महिलांसाठी आरक्षित झाल्यानंतर मनीषा पाटील यांना संधी देण्याचा शब्द राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिला होता. परंतु, पदाधिकारी निवडीवेळी अचानक सभापतिपद स्वीकारण्याची सूचना दिली. त्यावेळी उर्वरित कालावधीत मनीषा पाटील यांना अध्यक्षपदाची संधी देण्याचा शब्द दिला होता. हा शब्द राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पाळावा, एवढीच आमची मागणी आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी चर्चा करावी. मनीषा पाटील लगेच राजीनामा देतील, अशी प्रतिक्रिया तानाजी पाटील यांनी दिली.