शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मालगावचे दारू दुकान स्थलांतरासाठी ‘गाव बंद’

By admin | Updated: October 9, 2015 00:46 IST

ग्रामस्थ निर्णयाशी ठाम : ‘राज्य उत्पादन’चा खोडा

मालगाव : मालगाव (ता. मिरज) येथील सरकारमान्य देशी दारूची दुकाने गावाबाहेर स्थलांतरित करावी, या मागणीसाठी सर्व गाव बंद ठेवण्यात आले. बंदमुळे गावातील व्यवहार दिवसभर ठप्प होते. यावेळी शांतता, सुव्यवस्थेसाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मालगाव येथे मुख्य रस्त्यावर असणारी दोन सरकारमान्य देशी दारुची दुकाने गावाबाहेर स्थलांतरित करण्याच्या मागणीवरून दारु दुकान चालकांविरुद्ध ग्रामपंचायत सत्तधारी गटात वाद निर्माण झाला आहे. यापूर्वी व ग्रामपंचायत सत्तांतरानंतर ग्रामसभेच्या माध्यमातून सत्ताधारी गटाने दारु दुकाने स्थलांतराच्या विषय लावून धरला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने प्रस्ताव नसल्याने दुकाने स्थलांतराची मागणी फेटाळली आहे. आंदोलनकर्ते मात्र आपल्या मागणीसाठी ठाम आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन सत्ताधारी गटाने दुकाने स्थलांतरासाठी दि. ८ रोजी गांव बंदचा निर्णय घेतला. या निर्णयावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने आक्षेप घेतला. आंदोलन नियमावली असल्याचे ग्रामपंचायतीला कळविल्याने वादात भर पडली. मिरज ग्रामीणचे पोलीस निरीक्षक राजू मोरे यांनी नेते आप्पासाहेब हुळ्ळे, काकासाहेब धामणे, सरपंच प्रशांत माळी, उपसरपंच शशिकांत कनवाडे, प्रदीप सावंत, संजय काटे यांची भेट घेऊन बंद शांततेत पाळण्याचे आवाहन केले. (वार्ताहर)आंदोलन तीव्र करणारमालगाव येथील दारु दुकाने मुख्य रस्त्यावर आहेत. याचा ग्रामस्थांना त्रास होतो. दुकाने गावाबाहेर स्थलांतरित करावीत, अशी मागणी आहे. या मागणीसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे पाठपुरावा करूनही हा विभाग दुकान चालकांना पाठीशी घालत आहे. जोपर्यंत दुकाने स्थलांतरित होत नाहीत, तोपर्यंत टप्प्याने आंदोलन तीव्र करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.