शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

मालगाव ग्रामपंचायतीस टाळे ठोकण्याचा इशारा

By admin | Updated: July 17, 2014 23:41 IST

सोमवारी आंदोलन : नियमित अधिकारी नेमा

मालगाव : मालगाव (ता. मिरज) येथे गेल्या पाच महिन्यांपासून कायमस्वरुपी ग्रामविकास अधिकारी नसल्याने त्याचा विकास कामांवर परिणाम झाला आहे. ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामविकास अधिकारी नियुक्तीसाठी संघर्ष करुनही मिरज पंचायत प्रशासन कायमस्वरुपी ग्रामविकास अधिकारी देण्यास टाळाटाळ करीत असल्याने दि. २१ जुलै रोजी ग्रामपंचायतीला टाळे ठोकण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. मालगाव येथील ग्रामविकास अधिकारी एम. आर. सरगर यांची बदली झाल्यापासून येथे प्रभारी ग्रामविकास अधिकाऱ्यांवर ग्रामपंचायतीचे कामकाज चालविले जात आहे. परिणामी चाळीस हजार लोकसंख्येचा गावकारभार रुतला आहे. ग्रामविकास अधिकारी आनंदा ढेरे यांची नियुक्ती होती. त्यांना पदोन्नती मिळाल्याने पुन्हा खंडेराजुरीचे ग्रामविकास अधिकारी सरगर यांच्याकडे प्रभारी कारभार देण्यात आला आहे. त्यांच्याकडे खंडेराजुरी आणि मालगावचा कारभार सोपविल्यामुळे ग्रामस्थांची अडचण होत आहे. प्रशासनाने स्वतंत्र ग्रामविकास अधिकारी द्यावा जेणे करून मालगावच्या अडीअडचणी सोडविण्यात अडचणी येणार नाहीत. पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी कायमस्वरुपी ग्रामविकास अधिकारी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप ग्रामविकास अधिकाऱ्यांची कायमस्वरुपी नेमणूक न झाल्याने ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. ग्रामविकास अधिकाऱ्यांची कायमस्वरुपी नेमणूक न केल्यास दि. २१ रोजी ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. (वार्ताहर)ग्रामपंचायतीस कायमस्वरुपी ग्रामविकास अधिकाऱ्यांची गरज आहे. आम्ही लेखी पत्र देऊनही प्रशासनाने ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या नेमणुकीकडे दुर्लक्ष केले आहे. यामुळे ग्रामस्थांनाही अडचणींचा सामना करावा लागत असल्याने त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकण्याचा निर्णय घेतला आहे, तो योग्य आहे. वेळ पडल्यास आम्हालाही ग्रामस्थांच्या भूमिकेला समर्थन द्यावे लागणार आहे, अशी प्रतिक्रिया सरपंच प्रदीप सावंत यांनी व्यक्त केली.