शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

माळवाडीतील बाजार मैदानाची दुरवस्था

By admin | Updated: June 20, 2015 00:34 IST

उद्घाटनाला सापडेना मुहूर्त : निष्काळजीपणामुळे ११ लाखांचा निधी वाया जाणार

शरद जाधव - भिलवडी -माळवाडी (ता. पलूस) येथे चार वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या बाजार मैदानाच्या उद्घाटनाला मुहूर्तच सापडत नसल्याने बाजार मैदानाची दुरवस्था झाली आहे. माजी मंत्री आमदार डॉ. पतंगराव कदम यांच्या फंडातून खर्च करण्यात आलेला अकरा लाख रुपयांचा निधी वाया जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे.चार वर्षापासून माळवाडीमध्ये दर बुधवारी आठवडी बाजार सुरु केला. आठवड्याच्या मध्यावर हा बाजार भरत आहे. यामुळे माळवाडीसह भिलवडी, धनगाव, खंडोबाचीवाडी, भिलवडी स्टेशन, चोपडेवाडी, सुखवाडी आदी परिसरातील नागरिकांची चांगली सोय झाली आहे. सुरुवातीपासूनच हा बाजार माळवाडी बसस्थानकापासून ग्रामपंचायतीकडे जाणाऱ्या गावातील अंतर्गत रस्त्यांवर बाजार भरविला जातो. नागरिक व व्यापाऱ्यांची गैरसोय टाळण्याच्या हेतूने ग्रामपंचायतीने शिवाजीनगर येथील मैदानावर बाजार भरविण्याचे नियोजन केले.डॉ. कदम यांनी बाजार मैदानाच्या विकासासाठी ११ लाखांचा निधी तत्काळ मंजूर करुन दिला. त्यांच्याच हस्ते या कामाचा भूमिपूजन प्रारंभ होऊन गतीने सुरू झालेले काम पूर्णत्वास गेले. पण या ठिकाणी बाजार मैदानाच्या विकासाबरोबच दीडशेवर व्यापारी बसतील, असे बाजार कठडेही बांधण्यात आले.ग्रामसभेमध्ये या बाजार मैदानाला दोन महापुरुषांची नावे देण्यावरून बरेच वाद रंगले. केवळ चर्चाच झाल्या; पण बाजार भरविण्याबाबत कोणतीच कार्यवाही झाली नाही. सत्ताधाऱ्यांना किंवा विरोधकांनाही याचे कोणतेच सोयरसुतक नाही.त्यामुळे सध्या या जागेचा वापर काहीजण जनावरे बांधण्यासाठी वाहने लावण्यासाठी, अडगळीचे साहित्य ठेवण्यासाठी, तर महिला शेणी लावण्यासाठी करतात. या बाजारमैदानाच्या भूमिपूजन समारंभप्रसंगी लावलेली कोनशिलाही गायब करण्यात आलेली आहे.ग्रामपंचायतीने पुढाकार घ्यावानियोजनशून्यतेच्या व इच्छाशक्तीचा अभाव असल्याने डॉ. कदम यांच्या प्रयत्नातून केलेल्या विकासकामाच्या निधीचा मोठ्याप्रमाणात अपव्यय होत आहे. माळवाडी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व नेतेमंडळींनी तात्काळ नव्या जागेत बाजार भरविण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.या परिसरात मोठ्याप्रमाणात अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले असून, ठिक ठिकाणी झाडे-झुडपेही उगवली आहेत. भूमिपूजन समारंभप्रसंगी लावलेली कोनशिलाही गायब करण्यात आलेली आहे. येथील दुरवस्थेकडे ग्रामपंचायतीने लक्ष न दिल्यास शासनाचा निधी वाया जाण्याची शक्यता असल्यामुळे ग्रामस्थांतून नाराजी व्यक्त होत आहे.