शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

अज्ञात वाहनाच्या धडकेत मळणगावचा जवान ठार

By admin | Updated: August 28, 2016 00:19 IST

भोसले हे भारतीय सैन्यदलात जवान

देशिंग : मिरज-पंढरपूर राज्य मार्गावर कुची (ता. कवठेमहांकाळ) येथील शेरी पुलाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार सुधाकर बाबासाहेब भोसले (वय ३०, रा. मळणगाव) हे जागीच ठार झाले. भोसले हे भारतीय सैन्यदलात जवान होते. हा अपघात शुक्रवारी मध्यरात्री घडला . सुधाकर भोसले हे २००६ मध्ये सैन्यात भरती झाले होते. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी ते वीस दिवसांच्या सुटीवर मळणगाव येथे आले होते. तर सुटी संपत आल्याने ते पुन्हा जाण्याच्या तयारीत होते. माहेरी गेलेल्या पत्नीस मळणगावला घेऊन येण्यासाठी ते मदभावी (ता. अथणी) येथे दुचाकीवरून (एमएच १४ सीई ८५९६) निघाले होते. कुची येथील शेरी पुलावर त्यांच्या दुचाकीस अज्ञात वाहनाने धडक दिली. अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. मध्यरात्री कवठेमहांकाळ पोलिसांच्या गस्त पथकास ते मृतावस्थेत रस्त्यावर पडलेले दिसून आले. मळणगाव गावातील व्यवहार बंद ठेवून शोक व्यक्त करण्यात आला. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी असा परिवार आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक सचिन वसमळे करीत आहेत. (वार्ताहर)