शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गाची भूसंपादन प्रक्रिया पारदर्शक करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:28 IST

खानापूर पूर्व भागातील महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी महामार्गाच्या संयुक्त मोजणीबाबत तक्रार करून मोजणी रोखून धरली होती. त्यामुळे प्रांताधिकारी भोर यांनी ...

खानापूर पूर्व भागातील महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी महामार्गाच्या संयुक्त मोजणीबाबत तक्रार करून मोजणी रोखून धरली होती. त्यामुळे प्रांताधिकारी भोर यांनी सोमवारी दुपारी विटा येथे महामार्ग बाधित शेतकरी, महामार्ग अधिकारी व भूमी अभिलेख अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत शेतकऱ्यांनी चुकीच्या पध्दतीने होत असलेल्या भूसंपादन प्रक्रियेबाबत नाराजी व्यक्त केली.

यावेळी अखिल भारतीय किसान सभेचे जिल्हाध्यक्ष उमेश देशमुख, जिल्हा संघटक गोपीनाथ सूर्यवंशी यांच्यासह शेतकऱ्यांनी भूसंपादन करताना शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे, गटाच्या रस्त्यालगतच्या हद्दी शेतकऱ्यांना दाखवाव्यात, मोजणी गटाच्या जुन्या अस्तित्वात असलेल्या सर्व्हे नंबरच्या खुणा लक्षात घेऊन मोजणी करावी, यापूर्वी रस्त्याच्या कामात झालेल्या स्थावर मालमत्ता, फळझाडे, पाइपलाइन, कूपनलिका यांची नोंद घेऊन शेतकऱ्यांना मोबदला द्यावा तसेच मोजणीबाबत होणाऱ्या त्रुटीबाबत भूमी अभिलेख यांच्यामार्फत खुलासा करावा अशा विविध मागण्या केल्या.

यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उपअभियंता तुषार शिरगुप्पे यांनी आतापर्यंत महामार्गाच्या झालेल्या कामात स्थावर मालमत्ता, फळझाडे नुकसानीबाबत येत्या सोमवारपासून प्रत्येक गावात जाऊन सविस्तर माहिती घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देऊ, अशी ग्वाही दिली. तर तालुका भूमी अभिलेख अधिकारी रोहिणी सागरे यांनी संयुक्त मोजणीत काही त्रुटी असतील तर शेतकऱ्यांनी पुराव्यानिशी सादर कराव्यात. त्या तातडीने दुरूस्त केल्या जातील, असे सांगितले.

या बैठकीस सचिन जाधव, दाजी पवार, महानंद हसबे, अशोक हसबे, सुनील हसबे, दौलत भगत, जयराम जाधव, भरत पाटील यांच्यासह अखिल भारतीय किसान सभेचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

चौकट

आजपासून संयुक्त मोजणी सुरू...

प्रांताधिकारी संतोष भोर यांनी शेतकऱ्यांना पहिल्यांदा मोजणी प्रक्रिया होऊ द्या, त्यानंतर पुढील प्रक्रिया करू, असे सांगितल्यानंतर शेतकऱ्यांनी त्या प्रस्तावाला मान्यता दिली. त्यामुळे महामार्गाची संयुक्त मोजणी प्रक्रिया मंगळवारपासून पुन्हा सुरू होणार आहे. मात्र, तोपर्यंत महामार्गाचे उर्वरित काम बंद ठेवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

फोटो : १५०२२०२१-विटा-हायवे

ओळ : विटा प्रांताधिकारी कार्यालयात सोमवारी महामार्गबाधित शेतकरी व महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांची प्रांताधिकारी संतोष भोर यांच्यासमवेत बैठक झाली.