शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

चांदोली प्रकल्पग्रस्तांच्या अंतिम याद्या बनवा : राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 00:03 IST

वारणावती : उखळू (ता. शाहूवाडी) व मणदूर, चांदोलीवाडी (ता. शिराळा) येथील प्रकल्पग्रस्तांच्या संकलन याद्या अंतिम करून देय

ठळक मुद्देवारणावती येथे सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातील पुनर्वसन अधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार यांची बैठकतेथे वन्य प्राण्यांच्या चाºयाची उपलब्धता होऊ शकते. त्याबाबत सोय करण्यात येईल,

वारणावती : उखळू (ता. शाहूवाडी) व मणदूर, चांदोलीवाडी (ता. शिराळा) येथील प्रकल्पग्रस्तांच्या संकलन याद्या अंतिम करून देय जमिनींचा आराखडा तयार करावा. यासंदर्भात कृष्णा खोरे विकास महामंडळाचे नावे असलेल्या जमिनी राज्य शासनाकडे हस्तांतरित करण्यात याव्यात यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याशी चर्चा करून पाठपुरावा करू, असे आश्वासन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व खासदार राजू शेट्टी यांनी दिले.

वारणावती (ता. शिराळा) येथील विश्रामगृहात शेतकºयांच्या प्रश्नावर सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पुनर्वसन अधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्यातील बैठकीत चर्चा करताना खासदार शेट्टी बोलत होते.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी राजू वडाम, सरपंच राजाराम मुटल, तानाजी वडाम यांनी सांगितले की, चांदोली अभयारण्यातील अधिकारी शेतकºयांवर अन्याय करतात, त्यांचा अतिरेक थांबला पाहिजे व अभयारण्याच्या हद्दी निश्चित करून चराऊ क्षेत्र सोडावे.त्यासंबंधी एका महिन्यात मोजणी करण्यात येईल असे वन्यजीव विभागाच्या अधिकाºयांनी सांगितले. वन्य प्राणी शेतीचे नुकसान करतात. त्यासंबंधी अभयारण्यातील टाकळे, झोळंबी, सोनार्ली, निवळे, लोटीव या गावांच्या हद्दीतील शेकडो हेक्टर क्षेत्रात नैसर्गिक पाण्याचे स्रोत आहेत. तेथे वन्य प्राण्यांच्या चाºयाची उपलब्धता होऊ शकते. त्याबाबत सोय करण्यात येईल, असेही अधिकाºयांनी सांगितले.

उखळू येथे शामाप्रसाद मुखर्जी योजनेंतर्गत गॅस कनेक्शन पुरविण्यात आले आहेत. पण त्यामध्ये भ्रष्टाचार झाला आहे. त्यासंदर्भात कमिटीचे अध्यक्ष व सचिवांवर १५ दिवसात निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे. संपूर्ण रक्कम वसूल करून शेतकºयांना दिली जाईल, असे मुख्य वनसंरक्षक व्ही. क्लेमेट बेन यांनी सांगितले.

यावेळी शाहूवाडीचे प्रांताधिकारी चंद्रशेखर सानप, वाळव्याचे प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, पुनर्वसन अधिकारी स्वाती कुलकर्णी, शिराळा तहसीलदार दीपक शिंदे, प्रादेशिक वन विभागाचे अधिकारी तानाजी मुळीक, सावळा पाटील, यांच्यासह उखळू, सोनवडे, मिरुखेवाडी, गुढे, करूंगली, काळुंद्रे, खिरवडे येथील शेतकरी उपस्थित होते.अभयारण्यात इतर ठिकाणचे प्राणी सोडू नकायावेळी खासदार शेट्टी म्हणाले की, शेतकºयांच्या प्रश्नावर अधिकाºयांनी नरमाईचे धोरण घेऊन अन्याय थांबला पाहिजे. येथून पुढे अन्य ठिकाणांहून बिबट्या, वानरांचे कळप, कुत्री, मगरी असे कोणतेही प्राणी चांदोली अभयारण्यात सोडू नयेत.