शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

म्हैैसाळचे आवर्तन मेअखेर

By admin | Updated: May 5, 2016 00:24 IST

शेतकऱ्यांना दिलासा : चार दिवसात सांगोला परिसरात पाणी सोडणार

मिरज : कोयनेतून पाणी सोडण्यात आल्याने म्हैसाळ योजनेचे पंप बुधवारी पुन्हा सुरू झाले. २० फेब्रुवारीपासून म्हैसाळ योजना सुरू असून, मेअखेरपर्यंत आवर्तन सुरू ठेवण्यात येणार असल्याचे म्हैसाळच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सुमारे सात कोटी म्हैसाळची पाणीपट्टी जमा झाली असून, चार दिवसांत सांगोला तालुक्यात पाणी सोडण्यात येणार आहे. म्हैसाळच्या पाण्यामुळे ऐन उन्हाळ्यात शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.मिरज, कवठेमहांकाळ व जत तालुक्यात पाणी टंचाईमुळे म्हैसाळ योजना अडीच महिने सुरू आहे. वसंतदादा, महांकाली, मोहनराव शिंदे या कारखान्यांनी तीन कोटी रुपये व शेतकऱ्यांनी ३० लाख रुपये जमा केल्यानंतर म्हैसाळ योजनेचे पंप सुरू झाले. या रकमेत एक महिना म्हैसाळचे आवर्तन सुरू ठेवण्यात येणार होते. मात्र मिरजेसह कवठेमहांकाळ, जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी पाणीपट्टीची रक्कम भरल्याने दोन महिन्यात सुमारे सात कोटी रुपये जमा झाले आहेत. म्हैसाळ योजनेचे यापूर्वी आॅगस्ट ते आॅक्टोबरपर्यंत ५० दिवस आवर्तन सुरू होते. मात्र कडाक्याच्या उन्हाळ्यामुळे जूनपर्यंत आवर्तन सुरू ठेवावेल अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. चार दिवसात जतमधून सांगोला परिसरात पाणी सोडण्यात येणार असून, यासाठी सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांकडून ५० लाख रुपये जमा झाले आहेत. (वार्ताहर)सात कोटींचे वीज बिल : पाणीपट्टी जमाम्हैसाळ योजनेच्या सध्या सुरू असलेल्या ७० दिवसांच्या आवर्तनासाठी सुमारे अडीच टीएमसी पाण्याचा वापर करण्यात आला आहे. मात्र म्हैसाळ योजनेची दोन महिन्यांची सात कोटी रुपये वीजबिलाची रक्कम आहे. म्हैसाळ योजना सुरू झाल्यापासून १३ वर्षांत केवळ तीन कोटी रुपये पाणीपट्टी जमा झाली होती. मात्र यावेळी तीन महिन्यांत सात कोटी रुपये पाणीपट्टी जमा झाली असल्याने म्हैसाळचे आवर्तन सुरू आहे.