शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

घानवड हद्दीत ‘टेंभू’चा मुख्य कालवा फोडला

By admin | Updated: April 1, 2016 01:27 IST

अज्ञातांचे कृत्य : सात मीटर कालव्याचे नुकसान

विटा : माहुलीच्या पंपगृह टप्पा क्र. ३ ब मधून खानापूर-तासगावकडे जाणारा टेंभू योजनेचा मुख्य कालवा बुधवारी मध्यरात्री घानवड हद्दीत अज्ञात लोकांनी जेसीबीच्या साहाय्याने फोडला. या प्रकाराने जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. अखेर माहुली येथील पंप बंद करून गार्डीच्या करंज ओढ्यात सोडण्यात आलेले पाणी बंद करण्यात आले. घानवड हद्दीत अज्ञातांनी कि. मी. २० मधील निरीक्षण पथाजवळ मुख्य कालवा फोडल्याने कालव्याचे सुमारे सात मीटरचे नुकसान झाले. टेंभू योजनेच्या खानापूर-तासगाव मुख्य कालव्याच्या कि. मी. २१ मधून करंज ओढ्यातून गार्डीकडे पाणी प्रवाहित करण्यात आले आहे. गार्डी, घानवड व हिंगणगादे हद्दीतील करंज ओढ्यातील ३० बंधारे या पाण्याने भरण्यात येणार होते. बुधवारी सकाळी आ. अनिल बाबर यांच्याहस्ते गार्डी येथे टेंभूच्या पाण्याचे जल्लोषी स्वागत करून पाणी पूजन करण्यात आले होते. त्याचदिवशी मध्यरात्री अज्ञातांनी कि. मी. २० मधील सा. क्र. १९/४५० मीटर येथील मुख्य कालवा जेसीबीच्या साहाय्याने फोडून टेंभूचे पाणी घानवड हद्दीतील साळ ओढ्यात सोडले. या प्रकाराची माहिती गुरुवारी सकाळी ६.३० वाजता टेंभूच्या अधिकाऱ्यांना मिळताच जलसंपदा विभागाचे सहायक अभियंता अमोल गुरव, उमेश साळुंखे, व्ही. डी. पाटील कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी अधिकाऱ्यांनी पहिल्यांदा माहुली पंपगृहात जाऊन बंद केल्याने गार्डीच्या करंज ओढ्यात येणारे पाणी बंद केले. हिंगणगादे-घानवडच्या ग्रामस्थांत वादावादी अज्ञातांनी कालवा फोडून साळ ओढ्यात पाणी सोडल्याने करंजे ओढ्यातून हिंगणगादेकडे जाणारे पाणी बंद झाल्याने हिंगणगादेपर्यंत पाणी पोहोचलेच नाही. त्यामुळे हिंगणगादेतील ग्रामस्थ संतप्त झाले. त्यानंतर घानवडच्याच अज्ञात लोकांनी कालवा फोडल्याचा संशय घेतल्याने हिंगणगादे व घानवड येथील ग्रामस्थांत काही प्रमाणात वाद झाला. अखेर आ. अनिल बाबर यांच्या मध्यस्थीनंतर या वादावर पडदा पडला. मात्र, सहायक अभियंता अमोल गुरव यांनी विटा पोलिसांत टेंभू योजनेचा कालवा फोडल्याचा गुन्हा दाखल केला आहे. (वार्ताहर)