शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत’तर्फे २ जुलैपासून संपूर्ण जिल्ह्यात रक्तदानाचा महायज्ञ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:17 IST

सांगली : कोरोना काळात अनेक प्रकारच्या निर्बंधामुळे रक्तदानाचा प्रवाह मंदावला आहे. त्यामुळे रक्ताचा तुटवडा निर्माण होऊन शस्त्रक्रियांसह अन्य उपचारांना ...

सांगली : कोरोना काळात अनेक प्रकारच्या निर्बंधामुळे रक्तदानाचा प्रवाह मंदावला आहे. त्यामुळे रक्ताचा तुटवडा निर्माण होऊन शस्त्रक्रियांसह अन्य उपचारांना अडचणी येत असल्याने ‘लोकमत’च्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात २ जुलैपासून ‘ नातं रक्ताचं’ या महारक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. २ जुलै रोजी लोकमतच्या सांगली कार्यालयातून याचा प्रारंभ होणार आहे.

ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त दि. २ ते १५ जुलै या कालावधीत ‘नातं रक्ताचं’ हा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे. विविध संस्था, संघटना ‘लोकमत’च्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करीत आहेत. २ जुलै रोजी सकाळी १० वाजता सांगलीच्या राम मंदिर चौकातील ‘लोकमत’च्या कार्यालयात मान्यवरांच्या हस्ते शिबिराचा प्रारंभ होणार आहे.

गेल्या काही महिन्यांपासून लॉकडाऊनच्या निर्बंधांमुळे रक्तदानाचे प्रमाण लक्षणीय घटले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. रुग्णांच्या नातेवाईकांना रक्त मिळविण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे. या परिस्थितीत सामाजिक दायित्व म्हणून ‘लोकमत‘ने पुढाकार घेऊन रक्तदान शिबिरांचे आयोजन केले आहे. या शिबिरातून शेकडो रुग्णांचे प्राण वाचणार आहेत. अनेकांना जगण्याचे बळ मिळणार आहे. रक्ताला जात, धर्म, पंथ नसतो. रक्तदानाने माणुसकीचे नाते तयार होते. त्यामुळे रक्तदानाच्या या महायज्ञात दात्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ‘लोकमत’ने केले आहे.

चौकट

यांनी करावे रक्तदान

१८ ते ६० वयोगटातील व्यक्ती

कोविड निगेटिव्ह झाल्यानंतर २८ दिवसांनी रक्तदान करता येते.

कोविड प्रतिबंधक लसीचा पहिला किंवा दुसरा डोस घेतल्यानंतर १४ दिवसांनी रक्तदान करता येते.