शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

आष्टा पालिकेत आता महिलाराज...

By admin | Updated: May 23, 2016 00:17 IST

दोन प्रभागांचा एक प्रभाग : विलासराव शिंदे यांच्यासाठी निवडणूक लक्षवेधी

सुरेंद्र शिराळकर --आष्टानगरपरिषदेची निवडणूक २०१६ च्या अखेरीस होत आहे. मागील अनेक वर्षे १९ नगरसेवकांना नगरसेवक पदाची संधी मिळत होती. त्याऐवजी यावर्षीपासून २१ नगरसेवक असणार आहेत. यापैकी तब्बल ११ जागांवर महिलांना संधी मिळणार असल्याने पालिकेत आता महिलाराज येणार आहे. काँग्रेस, शिवसेना, मनसे, स्वाभिमानी शेतकरी संघटना एकत्र लढण्याच्या तयारीत असताना माजी आमदार विलासराव शिंदे सलग पाचव्यांदा विजय मिळवित पंचमी साजरी करणार का?, याची शहरात चर्चा सुरू आहे.आष्टा शहराची लोकसंख्या सुमारे ३७ हजार १०५ आहे. एकूण मतदार २६ हजार ११८ आहेत. यातील पुरुष मतदार १३ हजार ५५६ आहेत, तर स्त्री मतदार १२ हजार ५६२ आहेत. १९९६ पासून विलासराव शिंदे यांच्या आष्टा शहर विकास आघाडीची पालिकेवर निर्विवाद सत्ता आहे. माजी ग्रामविकासमंत्री आ. जयंत पाटील यांचा गटही पालिकेच्या सभेत सहभागी असल्याने पालिकेवर राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. १९९६ पासून २०११ पर्यंत जयंत पाटील शिंदे गटाचेच नगरसेवक असून, केवळ २००६ च्या पालिका निवडणुका बिनविरोध झाल्याने, पालिका इतिहासात प्रथमच शिवसेनेच्या विनायक इंगवले यांना नगरसेवक पदाची संधी मिळाली होती. २०११ च्या पालिका निवडणुकीत विलासराव शिंदे गटाच्या विशाल शिंदे, दिनकर बसुगडे, झिनत आत्तार, सुवर्णा हबळे, झुंझारराव पाटील, कलगोंडा वग्याणी, बाबासाहेब सिध्द, संगीता सूर्यवंशी, रागिणी सावंत, मंगलादेवी शिंदे, धैर्यशील शिंदे, संजय घस्ते, रंजना शेळके या १३ जणांना संधी मिळाली, तर आ. जयंत पाटील गटाच्यावतीने संगीता वारे, जमिलाबी लतीफ, पद्मश्री मालगावे, आंनदा ढोले, नीता काळोखे, विजय मोरे या सहा उमेदवारांना नगरसेवक पदाची लॉटरी लागली होती. पालिकेच्या डिसेंबरअखेर निवडणुका होत असताना, शिंदे-पाटील गटाबरोबर विरोधकांतूनही नगरसेवक पदासाठी चढाओढ लागली आहे. पालिकेच्या सध्याच्या नगरसेवकांची संख्या १९ आहे, तर नुकत्याच जाहीर झालेल्या आरक्षणात एकूण २१ प्रभाग झाले आहेत. यातील स्त्रियांसाठी ११, तर पुरुषांसाठी १० प्रभाग राखीव आहेत.खुल्या गटातील पुरुषांना सहा, महिलांना सहा असे १२ प्रभागात उभे राहता येणार आहे. ओबीसी गटातील तीन महिला व तीन पुरुषांना संधी मिळणार आहे. अनुसूचित जाती-जमातीच्या दोन स्त्री व एका पुरुष उमेदवारास संधी मिळणार आहे. प्रारंभी एका प्रभागात एकच उमेदवार उभारणार असल्याची चर्चा असल्याने अनेकांच्या तोंडचे पाणी पळाले होते. आता २ प्रभागांचा एक प्रभाग झाल्याने अनेकांनी सुटकेचा श्वास टाकला. गतवेळी विरोधकांनी जास्त मते घेऊन देखील केवळ एकी नसल्याने त्यांना विजय मिळवता आला नव्हता. यातून बोध घेऊन विरोधकांच्या एकीसाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. आ. जयंत पाटील गटाचे नेतृत्व जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील करीत असून २१ प्रभाग झाल्याने त्यांची संख्या ६ वरून ७ होणार, की आणखी वाढणार, याकडे आ. पाटील गटाच्या कार्यकर्त्यांचे लक्ष आहे. शिंदे गटातही अनेकजण इच्छुक असून, विद्यमान कोणाला अर्धचंद्र मिळणार, याची चर्चा आहे. पालिका निवडणुकीला काही दिवसांचा अवधी असताना विरोधकांनी जोरदार फिल्डिंग लावल्याने माजी मा. विलासराव शिंदे पंचमी साजरी करणार, विरोधक बाजी मारणार, याची जोरदार चर्चा सुरू आहे. या निवडणुकीकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिल्याने राजकीय नेत्यांनीही आता कंबर कसली आहे. त्यातच आरक्षणामुळे परिस्थिती बदलल्याने नेत्यांसह येथील विद्यमान उमेदवारांसाठीही ही निवडणूक महत्त्वाची ठरली आहे. प्रभागाची रचना : लोक संख्येनुसारसध्या तीन ते चार प्रभागांचा एक प्रभाग असून, शासनाच्या नवीन नियमानुसार दोन प्रभागांचा एक प्रभाग होणार आहे. यात एक स्त्री व एक पुरुष उमेदवार असणार आहे. एका प्रभागाची रचना लोकसंख्येच्या प्रमाणात करण्यात येणार असल्याने सुमारे ३५०० च्या दरम्यान मतदार एका प्रभागात असण्याची शक्यता आहे. त्यामुळे २१ प्रभागांतील प्रभागांची संख्या १० राहणार आहे. ९ प्रभाग २ प्रभागांचे, तर एक प्रभाग ३ प्रभागांचा होणार आहे.