शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

महाआघाडीत दिलजमाई, महायुतीतही सूर जुळले...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 23:29 IST

अविनाश कोळी । लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर आता प्रचाराला वेग येणार आहे. ...

अविनाश कोळी ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर आता प्रचाराला वेग येणार आहे. यंदा महायुती विरुद्ध महाआघाडी असा सामना असल्याने चुरस वाढली आहे. सांगली विधानसभा मतदारसंघात सुरुवातीला दोन्हीकडे असणारे मतभेद आता संपुष्टात आल्याचे चित्र दिसत आहे. आघाडीतील पक्षांची दिलजमाई होत असताना, महायुतीमध्येही आता ‘मिले सूर मेरा तुम्हारा’चे गीत गायिले जात आहे. दोन्हीकडील एकसंधपणाचे दावे आता कितपत तग धरणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.सांगली विधानसभा मतदारसंघ हा सांगली लोकसभा मतदार संघातील मोठ्या मतदारसंघांपैकी एक आहे. मतांबाबतीत हा तिसऱ्या क्रमांकावर येतो. शहरी मतदान मोठ्या प्रमाणावर आहे. प्रत्येक निवडणुकीत याठिकाणी मोठ्या प्रमाणावर मतदान होत असल्याने या मतदारसंघाकडे महाआघाडी आणि महायुतीचे लक्ष लागले आहे. त्यामुळे प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात याठिकाणी दोन्ही बाजूंनी प्रचाराचे नियोजन करण्यात आले आहे. प्रचाराचा सुरुवातीचा टप्पा दोन्हीकडील नाराजी दूर करण्यात व उमेदवारीच्या गोंधळातच गेला आहे. आता दिलजमाई झाली असली तरी, प्रचाराच्या दुसऱ्या व अंतिम टप्प्यात ती कितपत टिकणार आणि त्याचे काय परिणाम राहणार, यावरच सर्व अवलंबून आहे. या विधानसभा मतदारसंघात काँग्रेस, जनता दल, भाजप, अपक्ष अशा प्रत्येकाला यश मिळाले आहे. सुरुवातीच्या सहा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे वर्चस्व होते.युती । प्लस पॉर्इंटस् काय आहेत?या मतदारसंघात भाजपची ताकद मोठी आहे. आमदार आणि नगरसेवकांचे एकत्रित बळ मोठे आहे. शिवसेनेकडेही दिग्गज नेते आहेत. त्यामुळे ही ताकद एकवटल्याने भाजपला युती म्हणून याठिकाणी मोठा लाभ मिळू शकतो.युती । वीक पॉर्इंटस् काय आहेत?शिवसेनेत मोठी गटबाजी आहे. पदाधिकारी, नेत्यांमध्ये एकमत नाही. याशिवाय भाजपचे उमेदवार आणि येथील आमदारांत यापूर्वी मतभेद निर्माण झाले होते. त्याचा थोडाफार परिणाम येथे दिसू शकतो.आघाडी । प्लस पॉर्इंटस् काय आहेत?सांगली मतदारसंघात काँग्रेस व राष्टÑवादीची ताकद अधिक आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार सांगली शहरातीलच आहेत. दोन्ही काँग्रेसची एकवटलेली ताकद ‘स्वाभिमानी’ला उल्लेखनीय बळ देऊ शकते.आघाडी । वीक पॉर्इंटस् काय आहेत?काँग्रेसअंतर्गत असलेली गटबाजी, राष्टÑवादीबद्दल कायम व्यक्त केला जाणारा संशय यामुळे आघाडीत एकमेकांबद्दल विश्वास कमी दिसून येतो. आघाडीधर्म ठोकरून इतरांना छुपी रसद पुरविण्याची येथे परंपरा आहे.