शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
3
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
4
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
5
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
6
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
7
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
8
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
9
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
10
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
11
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
12
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
13
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
14
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
15
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
16
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
17
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
18
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
19
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
20
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!

महाहादग्यात ‘सखीं’ची धमाल

By admin | Updated: October 13, 2015 00:26 IST

‘लोकमत’तर्फे आयोजन : ज्योत्स्ना कुलकर्णी, सोनाली कांबळे, स्मिता ठोंबरे विजेत्या

इस्लामपूर : ‘एक लिंबू झेलू बाई दोन लिंबू झेलू, हातुका—मतुका, आज आहे सोमवार—महादेवाला नमस्कार...’ अशा एकापेक्षा एक सरस पारंपरिक हादग्याच्या गाण्यांचा ताल धरत सखींसह महिलांनी महाहादग्याचा फेर धरला. सोमवारी जवळपास चार तास रंगलेल्या या महाहादग्याच्या महोत्सवात महिलांनी धमाल केली. ज्योत्स्रा कुलकर्णी, सोनाली कांबळे व स्मिता ठोंबरे या स्पर्धेतील विजेत्या ठरल्या. त्यांना आकर्षक बक्षीस देऊन गौरविण्यात आले.‘लोकमत’ सखी मंच आणि कुसूमताई राजारामबापू पाटील कन्या महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने हा महाहादगा आणि विविध स्पर्धांचा उपक्रम जल्लोषात झाला. ‘कुसूमताई’च्या मैदानावर सखी व महिलांचा हा महाहादगा उत्तरोत्तर रंगत गेला. हादग्याची गाणी, लंगडी, संगीत खुर्ची अशा स्पर्धांच्या जोडीला महिलांनी धरलेला फुगडीचा फेर आणि घोडा नाचविण्याच्या खेळाचा मनमुराद आनंद सखींनी लुटला.‘कुसूमताई’च्या मैदानावर शनिवारी प्राचार्य डॉ. राजेंद्र कुरळपकर यांच्याहस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. लंगडी स्पर्धेच्या सहा फेऱ्या घेण्यात आल्या. अत्यंत चुरशीने ही स्पर्धा झाली. अंगातील चापल्य आणि दमाची क्षमता दाखविणाऱ्या या अस्सल देशी खेळांचा स्पर्धकांनी आनंद घेतला. तसेच संगीत खुर्ची स्पर्धेतही सहभागी स्पर्धकांनी धमाल केली. शेवटी हादग्याच्या गाण्यांच्या माध्यमातून महिलांच्या गळ्यातील स्वर आणि नादमधुर गोडव्याने महाहादगा रंगत गेला. महिला—मुलींच्या सुरक्षेबाबत सजग करणारी कविता मनीषा बाबासाहेब कांबळे यांनी सादर केली. सखींनी त्याला दाद दिली. सखी मंच संयोजिका सुनंदा पेटकर, प्रा. डॉ. सुजाता पाटील यांनी सूत्रसंचालन केले. उपस्थित सखी व महिलांना खिरापत वाटण्यात आली.प्रा. बी. बी. भागवत, प्रा. डॉ. एस. जी. साळवे, प्रा. एस. जे. पाटील, प्रा. एन. एन. ठोंबरे, प्रा. शैलजा टिळे, प्रा. रेखा फसाले, प्रा. नयना वळीव यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. प्रा. तेजस्विनी डांगे—पाटील, प्रा. शैलजा यादव— पाटील, प्रा. स्वाती कुलकर्णी, प्रा. युवराज केंगार, प्रा. उज्ज्वला पाटील, प्रा. मनीषा माळी, राजेंद्र सावंत, राजन शिंदे, संजय पाटील, अरुण चांदणे यांनी विविध स्पर्धांचे संयोजन केले. (वार्ताहर)स्पर्धेतील विजेत्या..!हादगा गीते— ज्योत्स्रा कुलकर्णी (प्रथम), स्रेहा मोटे (द्वितीय). लंगडी— सोनाली कांबळे (प्रथम), श्रेया जाधव (द्वितीय). संगीत खुर्ची— स्मिता ठोंबरे (प्रथम), नीलम माळी (द्वितीय). स्पर्धेनंतर या विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली.