शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: कुख्यात दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबाचा खात्मा; १४ लोकांना यमसदनी धाडलं
2
आजोबा, वडील एक्स आर्मी... पतीही मेजर! कोण आहेत लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी...
3
Operation Sindoor: २५ मिनिटांत ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त; कर्नल सोफिया कुरैशी यांनी सांगितला थरार
4
Operation Sindoor : पाकिस्तानमध्ये हल्ल्याच्या २३ मिनिटे आधीच लष्कराने ट्विट केले? समोर आली माहिती
5
‘ऑपरेशन सिंदूर’चे श्रेय तुम्ही घेऊ नका, ते फक्त भारतीय सेनेचेच; संजय राऊतांची सरकारवर टीका
6
'ऑपरेशन सिंदूर'चा परिणाम! 'या' डिफेन्स स्टॉक्सने घेतली मोठी झेप; ३ महिन्यात नफा दुप्पट
7
Operation Sindoor: पाकिस्तान पिसाळला, शस्त्रसंधीचं उल्लंघन करत उखळी तोफा डागल्या, ७ भारतीयांचा मृत्यू
8
गृह मंत्रालय अलर्ट! निमलष्करी दलांच्या सुट्ट्या रद्द; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारत-पाकमधील तणाव वाढला
9
पाकिस्तानी स्टॉक मार्केटचे काय हाल ऐकाल...; रात्री भारताची मिसाईल कोसळली, दिवसा भीतीने शेअर बाजार...
10
"आता ज्यांच्या पोटात दुखेल त्यांनी थेट माझा देश सोडून जावं", मराठी अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल
11
Operation Sindoor Live Updates: "यापुढेही भारतावर हल्ल्याची शक्यता, म्हणून उत्तर देणे गरजेचे होते"
12
“भारताला स्वसंरक्षणाचा अधिकार, दहशतवाद्यांना...”; ‘ऑपरेशन सिंदूर’चे इस्रायलकडून खुले समर्थन
13
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'च नव्हे, भारताने आधीही पाकिस्तानविरुद्ध केलेल्या 'या' मोठ्या कारवाया!
14
Operation Sindoor: 'सिंधू ते सिंदूर'पर्यंत...! भारताच्या 'या' १५ पावलांनी पाकिस्तानच्या नाकीनऊ आणले
15
FD/RD/PPF सगळं विसराल, SIP मध्ये लपलाय खरा खजिना; ₹५००० ची गुंतवणूक कशी बनवेल तुम्हाला कोट्यधीश
16
Vastu Shastra: हिरव्या रंगाचे पायपुसणे दारात ठेवा, यश, कीर्ती, भाग्योदयाचा ग्रीन सिग्नल मिळवा!
17
Operation Sindoor : भारतीय सैन्याने दहशतवाद्यांचा रात्रीत खात्मा केला; पाकिस्तानमधील हल्ल्याचे फोटो आले समोर
18
“भारताने केलेली लष्करी कारवाई खेदजनक, दहशतवादाला विरोध पण...”; ‘ऑपरेशन सिंदूर’वर चीनचे भाष्य
19
Operation Sindoor : पाकिस्तानवर हवाई हल्ला करताच पुण्यातून लढाऊ विमाने झेपावली; मुंबईपर्यंत दिले संरक्षण...
20
ज्येष्ठ रंगकर्मी माधव वझे यांचं निधन; 'श्यामची आई', '३ इडियट्स' सिनेमांमध्ये केलं होतं काम

सांगली जिल्ह्यात यंत्रणा सज्ज

By admin | Updated: October 15, 2014 00:29 IST

आठ मतदारसंघांतील १०७ उमेदवारांचे भवितव्य होणार यंत्रात बंद

सांगली : जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांसाठी उद्या, बुधवारी मतदान होत असून, १०७ उमेदवारांचे भवितव्य मतदानयंत्रांत बंद होणार आहे. जिल्ह्यातील २ हजार ३२८ मतदानकेंद्र्रांवर सकाळी सातपासून सायंकाळी सहापर्यंत मतदान होणार असून, प्रशासकीय व पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. आठ विधानसभा मतदारसंघांसाठी एकूण २२ लाख १६ हजार ६११ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यासाठी जिल्ह्यात २ हजार ३२८ मतदानकेंद्रे तयार करण्यात आली असून, मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी दहा हजारांहून अधिक कर्मचारी, अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. जिल्ह्यात एकही मतदारसंघ संवेदनशील नसला तरी, चुरशीची निवडणूक असणारी ४२ मतदानकेंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. जिल्ह्यात एकूण मतदारांमध्ये १० लाख ६४ हजार ७५१ महिला, तर ११ लाख ५२ हजार ३६४ पुरुष मतदार आहेत. १४ हजार १२९ शासकीय सेवेतील मतदार आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी जाताना मतदार ओळखपत्र सोबत ठेवावे. मतदान ओळखपत्र नसल्यास अकरा पुराव्यांपैकी कोणताही एक पुरावा सोबत ठेवावा. मतदारांनी मतदारयादीत नाव असल्याची खात्री करून घ्यावी. संग्राम केंद्रे, सेतू कार्यालय, महा ई-सेवा केंद्र आदी ठिकाणी मतदारयादी पाहण्याची सोय करण्यात आली आहे. मतदान प्रक्रियेसाठी जिल्ह्यात ७४ व्हिडिओ कॅमेरे बसविण्यात आले असून, ४२ केंद्रांवर वेबकास्टिंगच्या माध्यमातून आॅनलाईन वॉच ठेवण्यात येणार आहे. मतदारांवर दबाव टाकला जाऊ नये म्हणून भरारी पथकेही नियुक्त करण्यात आली आहेत. मतदारसंघनिहाय उमेदवार मतदारसंघउमेदवार सांगली१९ मिरज१७ इस्लामपूर१३ शिराळा९ पलूस-कडेगाव ११ खानापूर१३ तासगाव-क.म.१४ जत११ एकूण१०७ निवडणूक एक नजर.... मतदारसंघ - ८ एकूण उमेदवार - १०७ महिला उमेदवार - ७ मतदार - २२,३०,७३४ महिला मतदार - १०,६४,४८२ पुरुष मतदार - ११,६४,४८२ मतदान केंद्रे - २,३२८ मतदानासाठी जिल्हा पोलीसप्रमुख, अतिरिक्त पोलीसप्रमुख, सहा पोलीस उपअधीक्षक, २३ पोलीस निरीक्षक, १३० उपनिरीक्षक, २०८९ पोलीस शिपाई, ९०० गृहरक्षक (होमगार्ड) दलाचे जवान, ८०० एसआरपी जवान असा अभूतपूर्व बंदोबस्त तैनात केला आहे.) मतदानासाठीची सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे. कुणी प्रलोभन दाखवत असेल तर त्यांच्याबाबत जिल्हा तक्रार सनियंत्रण कक्षाच्या टोल फ्री क्रमांकावर कळवावे. - दीपेंद्र्रसिंह कुशवाह, जिल्हाधिकारी, सांगली