शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात पाच महिन्यांनंतर नीचांकी रुग्णांची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:41 IST

सांगली : जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. मंगळवारी दिवसभरात १२ नवे रुग्ण आढळून आले असून, गेल्या ...

सांगली : जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. मंगळवारी दिवसभरात १२ नवे रुग्ण आढळून आले असून, गेल्या पाच महिन्यांतील नीचांकी रुग्णांची नोंद झाली आहे. दरम्यान, दिवसभरात एकाचा मृत्यू झाला, तर ४१ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

महापालिका क्षेत्रात मंग‌ळवारी मिरजेत एका रुग्णाची नोंद झाली. आटपाडी, तासगाव, मिरज व शिराळा तालुक्यात प्रत्येकी १, जत तालुक्यात ३, तर खानापूर तालुक्यात ४ रुग्ण आढळून आले. पलूस, कडेगाव, वाळवा व कवठेमहांकाळ तालुक्यात एकही रुग्ण आढळून आला नाही. दरम्यान, खानापूर तालुक्यातील एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

दिवसभरात आरटीपीसीआरच्या १७३ चाचण्या करण्यात आल्या. त्यात ५ पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून आले. अँटिजेनच्या १३२७ चाचण्यांत ८ रुग्ण सापडले. सध्या ५९ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यात ऑक्सिजनवर ४५, हाय फ्लो नेझल ऑक्सिजनवर ७, तर नाॅन इन्व्हेजीव व्हेंटिलेटरवर ७ रुग्ण आहेत. सध्या जिल्ह्यातील ३०७ व परजिल्ह्यातील १० जणांवर उपचार सुरू आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील एक रुग्ण उपचारासाठी दाखल झाला आहे, तर कर्नाटकातील एक रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

चौकट

मंगळवारी दिवसभरात...

आजचे रुग्ण : १२

उपचाराखालील रुग्ण : ३०७

आजअखेर बरे झालेले रुग्ण : ४५,२५०

मृत्यू : १७२३

आजअखेरचे एकूण रुग्ण : ४७२८०

चिंताजनक : ५९