शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात शिक्षणावर अत्यल्प खर्च दुर्दैवी

By admin | Updated: October 25, 2015 23:30 IST

पतंगराव कदम : पलूसकर शिक्षण संस्थेचा रौप्यमहोत्सव

पलूस : महाराष्ट्रात शिक्षणासारख्या महत्त्वाच्या विभागावर सर्वात कमी खर्च केला जातो, हे दुर्दैवी आहे, असे मत आ. पतंगराव कदम यांनी व्यक्त केले. येथील पंडित विष्णू दिगंबर पलूसकर बहु. शिक्षण संस्थेचा रौप्यमहोत्सवी समारंभ उत्साहात पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. पतंगराव कदम बोलत होते. खासदार संजयकाका पाटील अध्यक्षस्थानी होते. यावेळी आमदार जयंतराव पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, माजी आमदार पृथ्वीराजबाबा देशमुख, ज्येष्ठ उद्योजक नानासाहेब चितळे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.स्वागत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उदय परांजपे यांनी केले. यावेळी शिक्षण संस्थेच्या २५ वर्षांच्या शैक्षणिक, सामाजिक कार्याच्या वाटचालीचा आढावा घेणारी ‘रौप्यमहोत्सवी भरारी स्मरणिका’ व महाराष्ट्रातील नामवंत शिक्षण तज्ज्ञांच्या लेखांचा समावेश असणारे ‘शिक्षणविचार’ हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले.कदम पुढे म्हणाले, पलूसकर शिक्षण संस्थेने अल्पावधित गरूडभरारी घेतली आहे. आज रोजी या संस्थेच्या शिशु विकास मंदिर, माधवराव प्राथमिक विद्यामंदिर, माध्यमिक विद्यालय, ज्युनिअर कॉलेज या सर्व शाखांतून दोन हजारपेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. अनेक माजी विद्यार्थी देश-विदेशात विद्यालयाचे नाव गाजवत आहेत. या संस्थेच्या घडामोडी मी जवळून पाहिल्या आहेत. सध्याच्या काळात गुणवत्तेला पर्याय नाही. माणूस हाच शिक्षणाचा केंद्रबिंदू आहे. शिक्षणातून समाजपरिवर्तन करायचे आहे. परंतु महाराष्ट्रात सर्वात कमी खर्च शिक्षणावर होत असल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.जयंतराव पाटील म्हणाले, शाळा काढणे, चालविणे सोपे आहे, पण दर्जा टिकवून ठेवणे अवघड आहे. शाळा चांगली असेल तरच व्यक्तीची गुणवत्ता वाढते. नवनवीन शिक्षण पद्धती, संशोधनाचा जन्म युरोप, अमेरिकेत होतो; पण भारतात होत नाही, यासाठी प्रयत्नशील राहणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. उदय परांजपे यांनी राजकारणापासून दूर राहतही शिक्षण संस्था चांगली चालविली आहे. याचे विशेष कौतुकच वाटते, असे सांगितले. खासदार संजयकाका पाटील, माजी आ. पृथ्वीराज देशमुख यांनीही मनोगत व्यक्त केले. भगवानराव साळुंखे, वसंतराव पुदाले, अमरसिंह इनामदार, आर. एम. पाटील, एस. के. पाटील, उपाध्यक्ष सुभाष सदामते, सचिव जयंतीलाल शहा, संचालक सुनील रावळ, विश्वास रावळ, विठ्ठल देवळे, संजय परांजपे, प्राजक्त परांजपे, वर्षा शहा, प्राचार्य सुहास निकम, एस. पी. मेंगाणे, अलका बागल, तानाजी करांडे, विकास गुरव, प्रा. बी. एन. पोतदार, ए. के. बामणे यावेळी उपस्थित होते.सूत्रसंचालन धनंजय गाडगीळ यांनी केले, तर आभार संस्थेचे सचिव जयंतीलाल शहा यांनी मानले (वार्ताहर)मंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे नाराजीशिक्षणमंत्री विनोद तावडे आणि सहकारमंत्री चंद्रकांत पाटील हे दोघेही मंत्री कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाहीत. यामुळे त्यांना विविध कामांसाठी भेटण्यास आलेल्या लोकांना नाराज होऊन परत जावे लागले. मंत्र्यांनी पाठ फिरविल्याने संयोजकांनीही नाराजी व्यक्त केली.