शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

शिल्लक रकमेवरील तोटा २० कोटींच्या घरात

By admin | Updated: June 19, 2017 00:51 IST

सांगली जिल्हा बॅँक : रिझर्व्ह बॅँकेच्या धोरणाचा आर्थिक फटका; चिंता वाढली

सांगली : जिल्हा बँकांच्या शाखांमध्ये पाचशे आणि हजारच्या जुन्या नोटांच्या माध्यमातून जमा झालेले ३१५ कोटी रुपये अजूनही पडून आहेत. गेल्या आठ महिन्यात्ां या अनुत्पादित रकमेच्या माध्यमातून झालेला व्याजाचा तोटा आता वीस कोटींच्या घरात पोहोचला आहे. त्यामुळे बॅँकेची चिंता वाढली आहे.जुन्या नोटा जमा करण्याबाबतचे आदेश रिझर्व्ह बँकेकडून मिळण्याच्या आशा बँक प्रशासनाला कायम आहेत. ३१५ कोटी पाठविण्यासाठी तब्बल ६३० पेट्या लागणार असल्याने, त्यांची खरेदीही केली आहे. १४ नोव्हेंबरपासून बँकेकडे पैसे पडून असल्याने दररोज ६ लाख रुपयांच्या व्याजाचा भुर्दंड बसत आहे. केंद्र सरकारने आठ नोव्हेंबरला पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या. जिल्हा बँकेसह अन्य राष्ट्रीयीकृत व नागरी बँकांमध्ये ग्राहकांनी हजार व पाचशे रुपयांच्या स्वरूपात पैसे जमा केले होते. नोटाबंदी कालावधित चलन पुरवठा नसल्याने जिल्हा बँकेच्या शाखांचे काम ठप्प झाले होते. ग्रामीण भागात जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सर्वाधिक २१७ शाखा आहेत. गावातील शेतकरी आणि मजूर या बँकांशी जोडला गेला आहे. जिल्हा बँकेमध्ये ९ नोव्हेंबरनंतर चारच दिवस रकमा जमा करण्यास मिळाले होते. या कालावधित ३०० कोटी ५ लाख १६ हजार रुपये जमा झाले. बँकेत व्यक्तिगत खाती १ लाख ३ हजार ८०४ असून, त्यांच्याकडून २०८ कोटी ७१ लाख १५ हजार रुपये जमा झाले होते. व्यक्तिगत कर्जदारांची १,०४९ खाती असून, या खात्यांवर ३१ कोटी ६६ लाख ३४ हजार, संस्था सभासद १९ असून, त्यांच्या खात्यावर ५९ कोटी ६७ लाख ६७ हजार रुपये जमा झाले होते. बँकेकडे जमा झालेल्या नोटांची नाणेवारी रिझर्व्ह बँक आणि नाबार्डला यापूर्वीच देण्यात आली आहे. नाबार्डकडून पाचशे आणि हजारच्या नोटांची सर्वाधिक रक्कम जमा करण्यात आलेल्या शाखांची माहिती घेतली होती.