शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

प्रांत, तहसीलवर सीसीटीव्हीची नजर

By admin | Updated: December 10, 2014 23:49 IST

कडेगावमध्ये उपक्रम : भ्रष्ट कारभाराला आळा घालण्यासाठी प्रयत्न

कडेगाव : कडेगाव येथील तहसील आणि प्रांताधिकारी कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या दोन्ही कार्यालयात कॅमेऱ्याची करडी नजर असल्यामुळे भ्रष्ट कारभाराला आळा बसला आहे. प्रशासनही गतिमान व पारदर्शक झाले आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे. पंचायत समिती तसेच मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील सर्व कार्यालयांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्यास येथील भ्रष्ट कारभाराला आळा बसेल.माजी मंत्री आमदार पतंगराव कदम यांनी कडेगाव तालुक्याची निर्मिती केली आणि सर्व विभागांची तालुकास्तरावर आवश्यक असणारी सर्व कार्यालये कडेगाव येथे आणली. ती कार्यालये सुसज्ज प्रशासकीय इमारतीमध्ये कार्यरत आहेत. प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे व तहसीलदार हेमंत निकम यांनी प्रशासकीय कामकाजाला शिस्त लावली आहे. परंतु पंचायत समिती, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालय, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, सहाय्यक निबंधक कार्यालय, नगरभूमापन कार्यालय, सामाजिक वनीकरण, वनपरीक्षेत्र कार्यालय, पोलीस ठाणे अशा सर्व ठिकाणी गतिमान व पारदर्शक कारभार व्हावा, कार्यालयीन शिस्त रहावी, यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे गरजेचे आहे.अनेक कार्यालयांमध्ये कर्मचारी जनतेशी उध्दट बोलतात व काही ठिकाणी कामाला दांडी मारून राजरोसपणे सह्या करून फुकटचा पगार घेतात. काही भ्रष्ट कर्मचारी टेबलाखालून चिरीमिरी मिळाल्याशिवाय जनतेची कामे करीत नाहीत. अशा मनमानीलाही आळा बसणे गरजेचे आहे.आता प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे व तहसीलदार हेमंत निकम यांनी त्यांच्या कार्यामध्ये प्रशासकीय कामकाजाला शिस्त लावून जनतेला दिलासा दिला आहे; परंतु तालुक्यातील अन्य सर्व कार्यालयांमध्येही अशीच शिस्त लावणे गरजेचे आहे. (वार्ताहर)झिरो पेंडन्सीवर भरकडेगाव तहसील कार्यालयात आता शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आलेले प्रस्ताव नियमात बसत असतील, तर तात्काळ मंजूर होत आहेत. रेशन कार्डची कामेही त्वरित होत आहेत. प्रांताधिकारी कार्यालयातही प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यावर प्रांताधिकारी कांबळे यांचा भर आहे. पलूस तालुक्यातील कामे आॅनलाईन कडेगावमधून होत आहेत.