शहरं
Join us  
Trending Stories
1
काय सांगता..! २,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली
2
आजचे राशीभविष्य: शुक्रवार 30 मे 2025; शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, नोकरी-व्यवसायात उत्साहित होऊन कामे कराल
3
पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली
4
महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये, महायुती म्हणून एकत्र लढणार : चंद्रशेखर बावनकुळे
5
पाकिस्तानी हेराचा हनी ट्रॅप; अभियंत्याला ठाण्यात अटक, डॉकयार्डमध्ये होता अभियंता
6
थकला-भागला 'विक्रम'; हमीभाव ठरविण्याची एकूण प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात
7
जोर ओसरतोय, पेरणीची घाई नको, ५ ते ६ दिवस पावसाची तीव्रता कमी असेल
8
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री
9
ईडीच्या उपसंचालकांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले; नेमकं प्रकरण काय?
10
युद्धविराममध्ये कधीही व्यापाराचा उल्लेख नव्हता; भारताने ट्रम्प यांच्या टॅरिफ दाव्यांना पुन्हा एकदा नाकारले
11
वैष्णवी तर गेलीच आहे, आता वाईट बोलू नका; वडिल अनिल कस्पटेंच्या भावनांचा बांध फुटला
12
Vinayak Chaturthi 2025: सद्गुरू वामनराव पै सिद्धीविनायकाकडे काय मागावं हे सांगताहेत!
13
RCB vs PBKS : कोहलीचं सेलिब्रेशन बघून अनुष्का शर्माला आलं हसू; तो व्हिडिओ होतोय व्हायरल
14
धारावीत निम्मी जागा सार्वजनिक वापरासाठी; उर्वरित जागेत पुनर्वसन, नूतनीकरणाचे होणार काम
15
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली महिलेची १ कोटी ८१ लाखांची फसवणूक; गुन्हे शाखेच्या कारवाईत टोळीचा पर्दाफाश
16
Covid-19 च्या डेल्टा व्हेरिएंटमुळे सायलेंट हॉर्ट अटॅक वाढले, आयआयटी इंदूरच्या अहवालात खुलासा
17
Ola Electric Q4 results: 'ओला'चे डोळे ओले! तोटा वाढून ₹८६० कोटींवर, महसुलातही ५९% ची घसरण
18
पाकिस्तानात गेलेल्या महिलेने हेरगिरी केल्याचा संशय, नागपुरात गुन्हा दाखल
19
राज्यसभेच्या ८ जागांसाठी १९ जूनला मतदान; मतांचे गणित जुळवणं सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान

एटीएम सेंटर्स, रिचार्ज व्हाऊचरवर नजर

By admin | Updated: June 29, 2014 00:37 IST

महापालिकेचा उत्पन्नवाढीचा उपाय : छोटे टॉवर, छत्र्यांबाबत आक्षेप

सांगली : महापालिका क्षेत्रातील मोबाईल टॉवरचा वाद अजूनही सुरूच असताना एटीएम सेंटर्स व मोबाईलच्या रिचार्ज व्हाऊचरवरील कराबद्दल महापालिका सतर्क झाली आहे. एटीएम सेंटर्सवरील छोटे टॉवर व छत्र्या आणि रिचार्ज व्हाऊचरच्या माध्यमातून ग्राहकांकडून वसूल केला जाणारा सेवाकर यापोटी महापालिकेला काही रक्कम मिळावी, यासाठी आता महापालिकेचा कायद्याचा अभ्यास सुरू झाला आहे. महापालिकेचे विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी यांनी महापालिका सभेत याबाबतचा मुद्दा उपस्थित केला. महापालिका क्षेत्रात किती एटीएम सेंटर्स आहेत, याची माहिती महापालिका दफ्तरी नाही. मोबाईल रिचार्ज व्हाऊचरच्या माध्यमातून महापालिका क्षेत्रात होणाऱ्या उलाढालीचीही कल्पना प्रशासनाला नाही. मोबाईल व्हाऊचरच्या माध्यमातून प्रत्येक ग्राहकाकडून सेवाकर आकारला जातो. कोट्यवधी रुपयांची उलाढाल याठिकाणी होत असताना ही उलाढाल कोणत्याही करासाठी पात्र ठरविण्यात आली नाही. प्रत्येक व्यक्तीला व व्यवसायाला कर लागू असताना व्हाऊचर यातून कसे सुटू शकतात, असा नवा मुद्दा उपस्थित झाला आहे. मोबाईल टॉवरचा वाद सध्या गाजत आहे. न्यायालयीन लढाईबरोबरच महापालिकेने विनापरवाना टॉवरवर कारवाई करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. महापालिकेला मोबाईल टॉवर कंपन्यांकडून कर हवा आहे. एकाच टॉवरवर उभारण्यात येणाऱ्या अन्य कंपन्यांच्या छत्र्या, शासन परिपत्रकापूर्वीची करवसुली, अशा अनेक मुद्द्यांवर सध्या महापालिकेला ‘टॉवर’वाद सुरू आहे. या टॉवरमध्ये आता एटीएम सेंटर्सवरील छोट्या टॉवर व छत्र्यांची भर पडली आहे. असे टॉवरही करपात्र असल्याचा मुद्दा मांडण्यात आला. महापालिकेमार्फत आता एटीएम सेंटर्सची माहिती घेतली जाणार आहे. सर्वेक्षणानंतर त्यावरील कराचा मुद्दा चर्चेला घेऊन उत्पन्नवाढीचा विचार मांडला जाणार आहे. (प्रतिनिधी)