शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 संभाजी पवार यांचा गट संजयकाका यांच्या पाठीशी-सांगलीत घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 12:56 IST

गेली पाच वर्षे भाजपपासून दूर असलेले माजी आमदार संभाजी पवार यांनी रविवारी भाजपचे लोकसभेचे उमेदवार संजयकाका पाटील यांना पाठिंबा जाहीर केला. भाजप नेत्यांनी कधीच आम्हाला अंतर दिलेले नव्हते. गत लोकसभेवेळी काही गैरसमज निर्माण झाले होते,

ठळक मुद्देदेवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांची मध्यस्थी

सांगली : गेली पाच वर्षे भाजपपासून दूर असलेले माजी आमदार संभाजी पवार यांनी रविवारी भाजपचे लोकसभेचे उमेदवार संजयकाका पाटील यांना पाठिंबा जाहीर केला. भाजप नेत्यांनी कधीच आम्हाला अंतर दिलेले नव्हते. गत लोकसभेवेळी काही गैरसमज निर्माण झाले होते, त्यामुळे मी नाराज होतो. पण आता सांगली व हातकणंगले या दोन्ही जागी महायुतीच्या उमेदवारांचा ताकदीने प्रचार करणार असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. 

भाजपचे आमदार सुरेश हळवणकर, खा. संजयकाका पाटील, आ. सुधीर गाडगीळ, माजी आमदार दिनकर पाटील यांनी सायंकाळी संभाजी पवार, त्यांचे पुत्र पृथ्वीराज व गौतम यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर भाजपच्या पाठिंब्याची घोषणा करण्यात आली. हळवणकर म्हणाले की, संभाजी पवार भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. मध्यंतरी काही मतभेद झाले होते. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पवार यांच्याशी चर्चा केली. देशाची सत्ता नरेंद्र मोदी यांच्याच हातात हवी, यासाठी महायुतीच्या प्रचारात सक्रिय होण्याची विनंती केली. त्याला सहमती दर्शवत संभाजी पवार यांनी संजयकाका पाटील यांच्यामागे उभे राहण्याचा निर्णय घेतला. हा एक ऐतिहासिक निर्णय आहे. 

खा. पाटील म्हणाले की, पवार यांनी अनेक वर्षे भाजपमध्ये काम केले. आमचे व त्यांचे तीन पिढ्यांचे ऋणानुबंध आहेत. गत निवडणुकीवेळी काही गैरसमज निर्माण झाले होते. पण त्यामुळे आमच्यात कुठेही कटुता नव्हती. पवार यांच्या या निर्णयाचे मी स्वागत करतो. त्यांचा आशीर्वाद व शक्ती माझ्या पाठीशी राहणार आहे. 

सुधीर गाडगीळ म्हणाले की, संभाजी पवार व माझा संबंध कॉलेज जीवनापासून आहे. मी त्यांचा ‘फॅन’ आहे. पहिल्या आमदारकीपासून मी त्यांच्यासोबत आहे. पाच वर्षापूर्वीच्या घटनांनी मी दु:खी होतो. आता ते आमच्यासोबत आल्याने आनंद झाला आहे.  भूतकाळात काही गोष्टी घडून गेल्या. आता आम्ही एकत्र भाजपचे विचार जनतेपर्यंत पोहोचवू, असे दिनकर पाटील यांनी सांगितले. 

पृथ्वीराज पवार म्हणाले की, २०१४ च्या निवडणुकीवेळी काही समज-गैरसमज निर्माण झाले होते. ते आता दूर झाले आहेत. भाजप-शिवसेनेने आम्हाला कधीच अंतर दिले नाही. भाजपने आमच्यावर पुत्रवत प्रेम केले. उद्धव ठाकरे यांनीही महायुतीच्या मागे ताकदीने उभे राहण्यास सांगितले होते. त्यामुळे आम्ही महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा देत आहोत. 

गौतम पवार म्हणाले की, मुख्यमंत्री फडणवीस व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा झाल्यानंतर आम्ही कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. सर्वच कार्यकर्त्यांनी भाजपच्या पाठीशी राहण्याबाबत सहमती दाखविली. सांगली व हातकणंगले मतदारसंघात आम्ही युतीच्या उमेदवारांचा ताकदीने प्रचार करणार आहोत. त्यांच्या प्रचारात आजपासूनच सक्रिय होत आहोत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकsangli-pcसांगली