शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 : संभाजी भिडेंच्या धारकऱ्यास प्रकाश आंबेडकरांची उमेदवारी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 16:09 IST

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांचे कट्टर समर्थक असलेले व धारकरी म्हणून गडमोहिमेत अनेकदा सहभागी झालेले गोपीचंद पडळकर यांना वंचित बहुजन आघाडीतर्फे सांगलीच्या जागेसाठी उमेदवारी जवळपास निश्चित झाल्याचे समजते. आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर हे संभाजी भिडे यांचे कट्टर विरोधक असताना त्यांच्या धारकऱ्यास उमेदवारी कशी दिली, असा सवाल उपस्थित होत आहे.

ठळक मुद्देसंभाजी भिडेंच्या धारकऱ्यास प्रकाश आंबेडकरांची उमेदवारी!राजकीय क्षेत्रात खळबळ, नागपूर येथे गोपीचंद पडळकरांशी चर्चा सुरु

सांगली : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांचे कट्टर समर्थक असलेले व धारकरी म्हणून गडमोहिमेत अनेकदा सहभागी झालेले गोपीचंद पडळकर यांना वंचित बहुजन आघाडीतर्फे सांगलीच्या जागेसाठी उमेदवारी जवळपास निश्चित झाल्याचे समजते. आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर हे संभाजी भिडे यांचे कट्टर विरोधक असताना त्यांच्या धारकऱ्यास उमेदवारी कशी दिली, असा सवाल उपस्थित होत आहे.नागपूर येथे थोड्याच वेळात आंबेडकर व पडळकर यांच्यात बैठक होऊन उमेदवारीबद्दल घोषणा होण्याची शक्यता आहे. पडळकर हे संभाजी भिडे यांचे कट्टर समर्थक असल्याची छायाचित्रे सोशल मिडियावर व्हायरल झाली आहेत. शिवरायांच्या सुवर्ण सिंहासन मोहिमेसाठी पडळकर यांनी भिडे यांना ११ लाख रुपयांची मदत केली होती. तसेच अनेक गडमोहिमेत ते सहभागी होते.प्रकाश आंबेडकर हे भिडे गुरूजींचे कट्टर विरोधक आहेत. भीमा कोरेगाव दंगलीप्रकरणात भिडे गुरूजी यांना अटक करण्याच्या मागणीसाठी आंबेडकर यांनी तीव्र आंदोलन केले होते. आंबेडकरी जनतेमध्येही भिडे यांच्याविषयी नाराजी आहे.

भिडे यांच्यासोबत पडळकर यांची अनेक छायाचित्रेही आहेत. पडळकरांच्या सामाजिक प्रवासाला भिडे यांचे नेहमी पाठबळ राहीले आहे. अशा परिस्थितीत त्यांना उमेदवारी दिली जात असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

दोन दिवसापूर्वी सांगलीसाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रकाश शेंडगे यांना उमेदवारी दिली होती, त्यात बदल करून याच जागेवर पडळकरांना उमेदवारी दिली जाणार आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकsangli-pcसांगलीSambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजी