शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या दिवशीही लॉकडाऊनमुळे सर्व ‘लॉक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:28 IST

सांगली : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सुरू असलेल्या कडक लॉकडाऊनला दुसऱ्या दिवशीही सांगलीकरांनी चांगला प्रतिसाद दिला. दोन दिवस पोलिसांनी कारवाईचा ...

सांगली : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सुरू असलेल्या कडक लॉकडाऊनला दुसऱ्या दिवशीही सांगलीकरांनी चांगला प्रतिसाद दिला. दोन दिवस पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारल्यानंतर विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांना चाप बसला आहे. माधवनगर रोड, कोल्हापूर रोडसह विश्रामबाग चौकात पोलिसांनी कसून तपासणी सुरू ठेवली होती.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कडक निर्बंध करूनही त्यांना प्रतिसाद मिळत नसल्याने प्रशासनाने बुधवारपासून आठ दिवसांसाठी कडक लॉकडाऊन जाहीर केले आहे. लॉकडाऊनची घोषणा झाल्यापासूनच पोलिसांनी कडक कारवाई सुरू केली होती. शुक्रवारी सकाळी सांगली-मिरज मार्गावर वर्दळ वाढल्याचे दिसून येताच पोलिसांनी विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील चौकात बॅरिकेड‌्स लावून प्रत्येक वाहनाची तपासणी सुरू केली. त्यात अत्यावश्यक सेवा वगळता अन्य कारणांनी फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.

पोलिसांकडून शुक्रवारी उपनगरांतही फिरून पाहणी करण्यात आली. कुपवाड रोडवरील लक्ष्मी मंदिर चौक, मंगळवार बाजार चौकात भाजी विक्रीसाठी थांबलेल्या रिक्षांवर कारवाई करण्यात आली. घरोघरी फिरूनही विक्रीस बंदी असतानाही अनेकजण बिनधास्तपणे फिरत होते. शहरात कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू असली तरी अनेकठिकाणी फूड डिलिव्हरी देणारे युवक गर्दी करून उभे होते. हॉटेलसमोर अशी गर्दी असल्याने महापालिकेच्या पथकाने या तरुणांनाही समज दिली.

शुक्रवारी उन्हाचा कडाका थोडा कमी हाेत पावसानेही हजेरी लावली होती त्यामुळे रस्त्यावरील नेहमीची वर्दळही रोडावली होती. सायंकाळी तर रस्ता सुनसान होता. तरीही प्रमुख चौकांत पोलीस तैनात होते.

चौकट

सगळ्यांचीच अत्यावश्यक सेवा; पोलीस हैराण

लॉकडाऊनच्या दुसऱ्या दिवशी पोलिसांनी तपासणीसाठी थांबवले की प्रत्येकजण अत्यावश्यक कारणांसाठीच बाहेर पडल्याचे सांगत होता. त्यातही औषधे आणण्यासाठी बाहेर पडल्याचे अनेकजण सांगत हाेते. मात्र, त्यांच्याजवळ औषधाची चिठ्ठी अथवा औषधेही नसत. त्यामुळे चौकशी करताना पोलीसही हैराण झाले होते. वाहनांवर ‘अत्यावश्यक सेवा’ लिहून फिरणाऱ्यांवरही कारवाई सुरूच ठेवत त्यांची वाहने जप्त करण्यात आली.