शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

एलबीटीप्रश्नी समितीची शिष्टाई अखेर असफल

By admin | Updated: August 5, 2014 00:14 IST

कारवाई होणारच : कृती समितीला फटकारले

सांगली : महापालिकेने एलबीटीच्या वसुलीसाठी दररोज २०० हून अधिक व्यापाऱ्यांना नोटिसा बजाविल्या आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांतही खळबळ उडाली असून, आज सायंकाळी एलबीटीविरोधी कृती समितीने आयुक्त अजिज कारचे यांची भेट घेऊन आचारसंहितेपर्यंत कारवाई थांबविण्याची पुन्हा एकदा विनंती केली. पण आयुक्तांनी, सहनशीलतेचा अंत झाला असून आता कारवाई थांबविणे शक्य नसल्याचे स्पष्ट करीत कृती समितीची शिष्टाई नाकारली. महापालिका हद्दीत एलबीटी लागू होऊन दीड वर्ष होत आले. व्यापाऱ्यांनी एलबीटीला विरोध करीत असहकार आंदोलन सुरू ठेवले आहे. त्याचा परिणाम महापालिकेच्या अर्थकारणावर झाला. मार्चपर्यंत महापालिकेने ५२ कोटी रुपयांचा एलबीटी वसूल केला होता. इतर महापालिकांच्या तुलनेत सांगलीच्या उत्पन्नात मोठी घट झाली. त्याबाबत आयुक्त कारचे यांना नगरविकास खात्याच्या सचिवांकडूनही जाब विचारण्यात आला होता. महापालिकेतील सत्ताधारी काँग्रेसनेही एलबीटीबाबत नरमाईची भूमिका घेतली होती. विकासकामे व कर्मचाऱ्यांचे पगार भागविण्याइतकेही उत्पन्न न मिळाल्याने अखेर आयुक्तांनी कठोर भूमिका घेत एलबीटी वसुलीसाठी कारवाईचे आदेश दिले.त्यानुसार गेल्या महिन्याभरापासून एलबीटी विभागाने व्यापाऱ्यांना नोटिसा बजाविण्याची कार्यवाही सुरू केली आहे. दररोज २०० हून अधिक व्यापाऱ्यांना नोटिसा बजाविल्या जात आहेत. पालिका हद्दीत एलबीटीस १५ हजार व्यापारी पात्र आहेत. त्यापैकी ८ हजार व्यापाऱ्यांनी नोंदणी केली आहे. नोटिसा दिल्यानंतरच नोंदणीची संख्याही वाढली आहे. जुलै महिन्यातील एलबीटीतही वाढ झाली असून, ७ कोटी २५ लाख रुपयांचा कर जमा झाला आहे. दरम्यान, एलबीटीविरोधी कृती समितीचे समीर शहा यांनी आज सायंकाळी आयुक्त अजिज कारचे यांची भेट घेऊन, कारवाई थांबविण्याची मागणी केली. सत्ताधारी नेत्यांनी आपला शब्द पाळून कारवाई थांबवावी, शासनाने निर्णय न घेतल्यास व्यापारी कर भरण्यास तयार आहेत, आचारसंहितेपर्यंत महापालिकेनेही सबुरीने घ्यावे, अशी विनंती शहा यांनी केली. महापालिका आयुक्तांनी त्यांचा हा प्रस्ताव फेटाळून लावला. आता याप्रकरणी कारवाई थांबविणे शक्य नाही, असे त्यांनी स्पष्टपणे सुनावले. (प्रतिनिधी)