लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : सांगली जिल्ह्यामध्ये २०२१-२२मध्ये जिल्ह्यातील गायी, म्हशींची उत्पादकता वाढविण्यासाठी सर्वसमावेशक अनुवांशिक सुधारणा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. नोंदणीकृत जातीवंत गायी व म्हशींपासून तयार होणाऱ्या कालवडी व रेड्यांना सहा महिन्यांच्या कालावधीनंतर प्रोत्साहनपर अनुदान म्हणून पाच हजार रूपये देण्यात येणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पशुपालकांनी दि. २२ जुलैपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. संजय धकाते यांनी केले आहे.
धकाते म्हणाले की, या योजनेत सहभागी होण्याकरिता जिल्ह्यातील पशुपालकांकडील जातीवंत जनावरांची निवड करुन नोंदणी करण्यात येणार आहे. नोंदणीकृत जातीवंत गायी व म्हशींपासून तयार होणाऱ्या कालवडी व रेड्यांना सहा महिन्यांच्या कालावधीनंतर प्रोत्साहनपर अनुदान म्हणून पाच हजार रूपये देण्यात येणार आहेत. त्यासाठी पशुपालकांनी त्यांच्या जवळच्या पशुवैद्यकीय संस्थेशी संपर्क साधून त्यांच्याकडील गायी व म्हशींचे अर्ज भरुन द्यावेत. या योजनेंतर्गत निवडलेल्या देशी व संकरीत गायी - म्हशींच्या कृत्रिम रेतनासाठी उच्च दर्जाच्या रेतमात्रा वापरण्यात येणार असल्याची माहिती डॉ. धकाते यांनी दिली.