शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

सांगली, कोल्हापूरच्या रक्तदात्यांकडून कर्नाटकच्या तरुणास जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 23:24 IST

सांगली : अपघातग्रस्त होऊन रुग्णालयामध्ये जीवन-मरणाच्या कुंपणावर असलेल्या एका तरुणाचा रक्तगट बॉम्बे असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर, त्या रुग्णालयामधील डॉक्टरांची चिंता ...

सांगली : अपघातग्रस्त होऊन रुग्णालयामध्ये जीवन-मरणाच्या कुंपणावर असलेल्या एका तरुणाचा रक्तगट बॉम्बे असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर, त्या रुग्णालयामधील डॉक्टरांची चिंता वाढली. प्रयत्नांची पराकाष्टा केल्यानंतर अखेर त्यांना सांगलीच्या बॉम्बे ग्रुपच्या माध्यमातून आशेचा किरण दिसला. कोल्हापूर व सांगली याठिकाणच्या बॉम्बे ग्रुपच्या दोन रक्तदात्यांनी धावाधाव करून या तरुणाला जीवदान दिले. माणुसकीचे अनोखे दर्शन घडवून रुग्णाचे नातेवाईक आणि डॉक्टरांची मनेही या तरुणांनी जिंकली.रायबाग येथील जनार्दन गोपाळ वंजिरे या ३३ वर्षीय तरुणाचा जांबोटी (ता. खानापूर, जि. बेळगाव) येथे अपघात झाला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला बेळगावच्या विजया हॉस्पिटलमध्ये दाखल केले. रक्ताच्या विविध तपासण्या केल्यानंतर, त्याचा रक्तगट अत्यंत दुर्मिळ म्हणजेच ‘बॉम्बे ओ’ असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. डॉक्टरांना हा रक्तगट किती दुर्मिळ आहे, याची कल्पना होती. त्यामुळे त्यांच्यासमोर अडचणी उभ्या राहिल्या. त्याचे प्राण वाचविण्यासाठी दोन बाटल्या रक्त तातडीने हवे होते. बेळगावसह कर्नाटकातील अनेक रक्तपेढ्यांशी संपर्क केल्यानंतरही, त्यांना हे रक्त उपलब्ध झाले नाही. शेवटी इंटरनेटवरून त्यांना सांगली जिल्ह्यात स्थापन झालेल्या बॉम्बे ब्लड ग्रुप आॅर्गनायझेशनचा संपर्क क्रमांक मिळाला. त्यावेळी ग्रुपचे संस्थापक विक्रम यादव यांनी हे रक्त उपलब्ध करून देण्याचे मान्य केले.कुची (ता. कवठेमहांकाळ) येथील हणमंत भोसले आणि कोल्हापूर येथील सुनील भोसले या दोघांशी त्यांनी संपर्क साधला. सुनील भोसले हे बेळगावला जाऊन रक्तदान करायला तयार झाले, मात्र हणमंत भोसले यांना कामावरून सुटी मिळणे मुश्किल होते. त्यामुळे त्यांनी कामाच्या ठिकाणी, आईच्या प्रकृतीचे कारण सांगून केवळ तीन तासांची सुटी काढली. त्यानंतर त्यांनी मिरजेतील एका रक्तपेढीत रक्तदान केले. ग्रुपच्या सदस्यांनी हे रक्त रेल्वेने बेळगावच्या हॉस्पिटलपर्यंत पोहोचविले. अत्यंत कमी वेळात हे रक्त पोहोचल्यामुळे त्या रुग्णाचे प्राण वाचविणे डॉक्टरांना शक्य झाले.नातेवाईकांच्या डोळ्यात अश्रूदोघांनी दाखविलेल्या माणुसकीमुळे रुग्णालयाचे डॉक्टर, कर्मचारी व रुग्णाचे नातेवाईक भारावून गेले. नातेवाईकांच्या डोळ्यात त्यांच्या मदतीने अश्रू उभे राहिले. वंजिरे यांचा धोका आता टळला असल्याचे सांगत, येथील डॉ. रवी पाटील, ब्लड बँकेचे संचालक गिरीश बुडरकट्टी यांनी भोसले यांचा पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला.काय आहे ‘बॉम्बे ब्लड’मुंबईमध्ये १९५२ मध्ये वाय. एम. भेंडे नावाच्या डॉक्टरनी या रक्तगटाचा शोध लावला होता. पूर्वी मुंबईला बॉम्बे म्हटले जायचे. म्हणून या शहराचेच नाव या रक्तगटाला देण्यात आले. हा सर्वात दुर्मिळ रक्तगट मानला जातो. याचे जगभरातील प्रमाण 0.000४ इतके आहे. या रक्तगटातील व्यक्तीचे रक्त अन्य लोकांना चालते, मात्र या लोकांना त्यांच्याच गटाचे रक्त लागते.