शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

कुंडलमध्ये जी. डी. बापूंच्या स्मारकाची उभारणी गतीने

By admin | Updated: November 9, 2015 23:29 IST

अरुण लाड यांची माहिती : ४० लाखांचा निधी उपलब्ध

कुंडल : येथील क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड यांच्या स्वातंत्र्य संग्रामातील स्मृतींची पुढील पिढीस माहिती होण्यासाठी, संपूर्ण समाजाला प्रेरणा मिळावी यासाठी कुंडल (ता. पलूस) येथे राज्य शासनाच्यावतीने क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड यांचे स्मारक उभारण्यात येत आहे. या स्मारकास शासनाची प्रशासकीय मंजुरी मिळाली असून, या कामासाठी ४० लाख रुपये उपलब्ध झाल्याने स्मारक उभारणीचे कामकाज गतीने चालू आहे, अशी माहिती क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.समाजामध्ये टोकाची असहिष्णुता वाढत असताना, विचार स्वातंत्र्याची मुस्कटदाबी होत असताना, स्वातंत्र्य संग्रामातील, देशसेवेचे, एकतेचे, सहिष्णुतेचे, सार्वभौमत्वाची स्फूर्ती हे गुण युवावर्गाने आत्मसात करावेत, याकरिता या स्मारकामध्ये ग्रंथालयाची व्यवस्था करण्यात येणार आहे. पारतंत्र्याचा काळ व स्वातंत्र्य मिळण्यासाठी स्वातंत्र्यसैनिकांनी लावलेली प्राणाची बाजी चित्ररूपाने आजच्या पिढीसमोर मांडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.या सर्व बाबींचा पाठपुरावा क्रांती कारखान्याच्या माध्यमातून होत आहे. प्रत्यक्ष बांधकामाचा आढावा घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता मिसाळ व कंत्राटदार व्ही. डी. वाजे आले असता, या स्मारकासाठी राज्य सरकारने ४ कोटी ९५ लाख ८७ हजार रुपयांच्या योजनेस मंजुरी दिली असून, दोन कोटी रुपयांचा निधी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वर्ग करण्यात आला आहे.यावेळी क्रांती दूध संघाचे अध्यक्ष किरण लाड, शरद लाड, कारखान्याचे उपाध्यक्ष भीमराव महिंद, पोपटराव संकपाळ, दिलीपराव पाटील, कुंडलिक थोरात, पोपटराव फडतरे, महावीर चौगुले, लालासाहेब महाडिक, श्रीरंग पाटील, आत्माराम हारुगडे, लक्ष्मण हेंद्रे, कुंडलिक एडके, वसंत लाड, जगन्नाथ आवटे, सी. एस. गव्हाणे, एस. आर. गायकवाड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. (वार्ताहर)